शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीनं रेल्वेचं एक पाऊल पुढे; पाच वर्षांमधील सर्वोत्तम कामगिरीची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2018 16:46 IST

गेल्या वर्षभरात अपघात आणि अपघाती मृत्यूंच्या प्रमाणात लक्षणीय घट

नवी दिल्ली: असुरक्षित प्रवासामुळे कायम रडारवर असणाऱ्या रेल्वेच्या सेवेत वर्षभरात चांगली सुधारणा झाली आहे. सप्टेंबर 2017 ते ऑगस्ट 2018 या वर्षभराच्या कालावधीत 75 रेल्वेअपघातांमध्ये 40 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 5 वर्षांमधील रेल्वे दुर्घटना आणि त्यातील बळींची संख्या लक्षात घेतल्यास, गेल्या वर्षभरात सुरक्षेच्या बाबतीत रेल्वेची कामगिरी सुधारली आहे. रेल्वे मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सरकारी आकड्यांचा आधार घेऊन ही माहिती दिली. सप्टेंबर 2016 ते ऑगस्ट 2017 या कालावधीत आठ अपघातांमध्ये 249 लोकांचा मृत्यू झाला होता. यातील इंदूर-पाटणा एक्स्प्रेसला झालेला अपघात सर्वात भीषण होता. नोव्हेंबर 2016 मध्ये इंदूर-पाटणा एक्स्प्रेस रुळावरुन घसरल्यानं झालेल्या अपघातात 150 हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता. मात्र गेल्या वर्षभरात रेल्वे अपघातांमध्ये जीव गमावणाऱ्यांची संख्या 40 वर आली आहे. या काळात दोन मोठे रेल्वे अपघात झाले. ऑगस्ट 2017 मध्ये उत्कल एक्स्प्रेसला झालेल्या अपघातात 20 लोकांचा मृत्यू झाला. तर यावर्षी एप्रिलमध्ये उत्तर प्रदेशात एका शाळेच्या बसला रेल्वेनं धडक दिल्यानं 13 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. सप्टेंबर 2013 ते ऑगस्ट 2014 या कालावधीत 139 रेल्वे अपघात झाले होते. त्यात 275 लोकांचा मृत्यू झाला होता. 2014 ते 2015 या कालावधीत 108 अपघातांमध्ये 196 जणांनी जीव गमावला होता. '1 सप्टेंबर 2013 ते 31 ऑगस्ट 2014 या कालावधीतील आकड्यांची तुलना 1 सप्टेंबर 2017 ते  31 ऑगस्ट 2018 या कालावधीतील अपघातांच्या आकडेवारीशी केल्यास दुर्घटनांची संख्येत लक्षणीय घट झाली आहे. रेल्वे गाड्यांची धडक आणि रेल्वे गाड्या रुळांवरुन घसरण्याच्या घटनांचं प्रमाण 62 वरुन 4 वर आलं आहे,' अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. 

टॅग्स :railwayरेल्वेAccidentअपघात