५० कोटी द्या अन् बायकोला माहेरी पाठवा; माथेफिरु नवऱ्याचा प्रताप पाहून रेल्वे प्रशासन चक्रावले 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2020 05:20 PM2020-01-02T17:20:48+5:302020-01-02T17:21:18+5:30

या पत्रात नवऱ्याने प्रशासनाला दोन मागण्या केल्या आहेत.

Railway Track Cut Unknown Persone Leave His Demand With Letter In Mau | ५० कोटी द्या अन् बायकोला माहेरी पाठवा; माथेफिरु नवऱ्याचा प्रताप पाहून रेल्वे प्रशासन चक्रावले 

५० कोटी द्या अन् बायकोला माहेरी पाठवा; माथेफिरु नवऱ्याचा प्रताप पाहून रेल्वे प्रशासन चक्रावले 

Next

मऊ - उत्तर प्रदेशातील मऊ येथे अजबगजब प्रकार उघडकीस आला आहे. एका माथेफिरु नवऱ्याने प्रेमविवाहाला कंटाळून रेल्वे रुळ कापण्याचा धक्कादायक प्रकार केला आहे. मऊ येथील रतनपुरा रेल्वे स्टेशनजवळ राहणाऱ्या या नवऱ्याचा प्रताप पाहून अनेकजण थक्क झाले. या प्रकारामुळे रेल्वे सेवेवर परिणाम झाला. घटनास्थळावर माथेफिरु नवऱ्याने एक पत्र देखील ठेवलं आहे. 

या पत्रात नवऱ्याने प्रशासनाला दोन मागण्या केल्या आहेत. या पत्रात त्यानं म्हटलंय की, प्रेमविवाह केल्यानंतर माझ्या पत्नीकडून माझा छळ सुरु झाला आहे. त्यामुळे मला ५० कोटी रुपये द्या आणि माझ्या पत्नीला परत घेऊन जा अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे. जर माझ्या या दोन्ही मागण्या मान्य न झाल्यास यापेक्षाही भयंकर नुकसान मी करु शकतो अशी धमकीही पत्रात देण्यात आली आहे. 

मऊ के रतनपुर में रेलवे ट्रैक को काट धमकी भरा पत्र चस्पा किया गया है।

या माथेफिरु नवऱ्याने रेल्वे रुळ २ इंच कापला होता. रेल्वे कर्मचाऱ्याच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ याची सूचना रेल्वे अधिकाऱ्यांना दिली. यावेळी बलिया-शाहगंज पॅसेंजर ट्रेन या मार्गावर जाणार होती. मात्र कर्मचाऱ्याच्या सतर्कतेने वेळीच मोठी दुर्घटना टळली. संबंधित घटनेच्या माहितीनंतर रेल्वे अधिकारी आणि पोलीस घटनास्थळावर पोहचले. याठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केली होती. पोलिसांनी पत्र ताब्यात घेतलं असून या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

पोलीस अधिक्षक अनुराग आर्य यांनी सांगितले की, एका माथेफिरु पतीने रेल्वे रुळ २ इंच कापला आहे. प्रेमविवाहाला कंटाळून पत्नीला माहेरी पाठविण्याबाबत पत्रात नमूद केलं आहे तसेच जर मागणी मान्य नाही केली तर आणखी तीव्र स्वरुपाचं नुकसान करु अशी धमकी दिली आहे. पोलिसांच्या पथकाकडून याची चौकशी सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली. 
 

Web Title: Railway Track Cut Unknown Persone Leave His Demand With Letter In Mau

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.