शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
4
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
5
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
6
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
7
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
8
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
9
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
10
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
11
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
12
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
13
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
14
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
15
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
16
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
17
‘निवडणूकपूर्व’साठी राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) अनुत्सुक; निवडणुकीनंतर युती करण्याला मात्र पसंती
18
४८ हजार जणांनी म्हटले, दुबार मतदान करणार नाही
19
‘अमेरिकन ड्रीम’ला H-1B व्हिसाचे नख लागते, तेव्हा...
Daily Top 2Weekly Top 5

video : "शांत...एकदम शांत बसा...", विरोधकांनी 'Reel मंत्री' म्हणताच अश्विनी वैष्णव संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2024 16:00 IST

विरोधी खासदारांनी 'रीलमंत्री' म्हणताच शांत स्वभावाचे अश्वनी वैष्णव संतापले आणि विरोधकांना जोरदार फटकार लगावली.

Ashwini Vaishnaw Speech:रेल्वेमंत्री अश्वनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांच्या लोकसभेतील भाषणादरम्यान गुरुवारी (1 ऑगस्ट) प्रचंड गदारोळ झाला. सरकारने रेल्वेमध्ये केलेल्या सुधारणांबाबत वैष्णव माहिती देत होते, यावेळी विरोधी खासदारांनी त्यांना 'रीलमंत्री' म्हणत टोमणा मारला. हे ऐकून शांत स्वभावाचे अश्वनी वैष्णव संतापले आणि विरोधकांना जोरदार फटकार लगावली. 

आम्ही रील बनवणारे नाही...काँग्रेसच्या आरोपांना उत्तर देताना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, आम्ही फक्त रील बनवणारे नाही, आम्ही काम करणारी माणसं आहोत. इथे जी लोकं ओरडत आहेत, त्यांनी सांगावे की, काँग्रेसने 58 वर्षांच्या सत्तेत एक किलोमीटर ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन (एटीपी) का बसवले नाही? यावेळी गदारोळा करणाऱ्या खासदारांवर संतापून "शांत बसा, एकदम शांत बसा...काहीही बोलतात..." असे म्हणत रेल्वेमंत्र्यांनी त्यांना खाली बसण्यास सांगितले. 

हा देश असा चालेल का - अश्विनी वैष्णवरेल्वेमंत्री पुढे म्हणतात, आज आमच्यावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनी सांगावे की, ममता बॅनर्जी रेल्वेमंत्री असताना देशातील रेल्वे अपघाताचा आकडा 0.24 वरून 0.19 वर आला होता, तेव्हा हे लोक सभागृहात टाळ्या वाजवायचे आणि हा आकडा 0.19 वरुन 0.03 वर आल्यावर आरोप करतात. हा देश असा चालणार का? काँग्रेसवाले सोशल मीडियावर आपल्या ट्रोल आर्मीच्या माध्यमातून खोटी माहिती पसरवतात. अयोध्येत स्टेशनची जुनी भिंत कोसळली, तेव्हा समाजवादी पक्ष आणि काँग्रेसने खोटी माहिती पसरवली. अशा खोटेपणाने देश कसा चालेल? दोन कोटी प्रवासी रोज प्रवास करतात. त्यांच्या मनात भीती बसवायची आहे का? असा प्रश्न त्यांनी यावेळी केला.

सरकारने अपघात रोखण्यासाठी काय केले?रेल्वेमंत्र्यांनी संसदेत सांगितले की, अपघात रोखण्यासाठी देशभरात मानवरहित रेल्वे क्रॉसिंग तयार करण्यात आले आहेत. स्टेशन्सचे संपूर्ण नियंत्रण इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगद्वारे केले जाते. 1980-90 च्या दशकात जगातील मोठ्या देशांमध्ये याची सुरुवात झाली. काम संथ गतीने सुरू होते. 2014 मध्ये सरकार आल्यानंतर आम्ही 2015 मध्ये एटीपी विकसित करण्याचा संकल्प केला आणि 2016 मध्ये कवचच्या चाचण्या सुरू झाल्या. कोविड असूनही 2020-21 मध्ये विस्तारित चाचण्या घेण्यात आल्या. देशात सुमारे 70 हजार किलोमीटरचे रेल्वे नेटवर्क आहे. अर्धे नेटवर्क असलेल्या देशांना एटीपी बसवायला जवळपास 20 वर्षे लागली. कवच बसवण्यात आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही, याची मी तुम्हाला ग्वाही देतो, असे अश्वीनी वैष्णव म्हणाले.

गेल्या 15 दिवसांत 8 वेळा रेल्वे अपघात सातत्याने होणाऱ्या रेल्वे अपघातांमुळे विरोधक रेल्वेमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. गेल्या 15 दिवसांत आठ रेल्वे अपघात झाले आहेत. फक्त जुलै महिन्याबद्दल बोलायचे झाले तर 18 जुलै रोजी चंदीगड-दिब्रुगड रेल्वे अपघात झाला होता, ज्यामध्ये 4 लोकांचा मृत्यू झाला होता, तर 31 जण जखमी झाले होते. 19 जुलै रोजी गुजरातच्या वलसाडमध्ये मालगाडी रुळावरून घसरली, 20 जुलै रोजी यूपीच्या अमरोहा येथे मालगाडीचे 12 डबे रुळावरून घसरले. 21 जुलै रोजी राजस्थानमधील अलवरमध्ये मालगाडीचे तीन डबे रुळावरून घसरले. 21 जुलै रोजी पश्चिम बंगालमधील राणाघाट येथे मालगाडी रुळावरून घसरली होती. 26 जुलै रोजी भुवनेश्वर, ओडिशात मालगाडी रुळावरून घसरली, 29 जुलै रोजी बिहार संपर्क क्रांतीचे डबे बिहारच्या समस्तीपूरमध्ये वेगळे झाले आणि 30 जुलै रोजी हावडाहून मुंबईला जाणारी एक पॅसेंजर ट्रेन झारखंडच्या चक्रधरपूरमध्ये रुळावरुन घसरली होती.

टॅग्स :Ashwini Vaishnawअश्विनी वैष्णवIndian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वेParliamentसंसदUnion Budgetकेंद्रीय अर्थसंकल्प 2019