‘रायडर’चे अश्लील चाळे, ‘आय लव्ह यू’ मेसेजही पाठविला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2023 07:05 IST2023-07-23T07:05:11+5:302023-07-23T07:05:21+5:30

पीडित महिलेने ट्विटरवर या घटनेचा खुलासा केला. 

'Raider' obscene chale, 'I love you' message also sent | ‘रायडर’चे अश्लील चाळे, ‘आय लव्ह यू’ मेसेजही पाठविला

‘रायडर’चे अश्लील चाळे, ‘आय लव्ह यू’ मेसेजही पाठविला

‘रॅपिडो’ बाईक-टॅक्सी चालकाकडून लैंगिक छळाची आणखी एक घटना बंगळुरूतून समोर आली आहे. पीडित महिलेने ट्विटरवर या घटनेचा खुलासा केला. 

मणिपूरमधील घटनेच्या निषेध मोर्चानंतर घरी जाण्यासाठी अथिराने रॅपिडो बाइक बुक केली होती. राइडदरम्यान, चालकाने एक हाताने दुचाकी चालवत दुसऱ्या हाताने अश्लील चाळे सुरू केले. अशा वेळी चालकाला पत्ता समजू नये म्हणून घरापासून २०० मीटर आधीच उतरली. ऑनलाइन पेमेंट करून ती गेली.

तथापि,  त्यानंतर चालक तिला व्हॉट्सॲपवर वारंवार कॉल आणि आय लव्ह यू व विविध इमोजी पाठवत आक्षेपार्ह मेसेज करू लागला. अखेर तिने ट्विटरवर त्याचे स्क्रीनशॉट टाकले आणि संपूर्ण घटना कथन केली.  तिचे ट्वीट व्हायरल झाल्यावर बंगळुरू शहर पोलिसांनी घटनेची दखल घेतली असून, आवश्यक कारवाई करण्यास सांगितले आहे.

Web Title: 'Raider' obscene chale, 'I love you' message also sent