''राहुल, प्रियांका गांधींनी दंगली भडकविल्या''

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 04:39 IST2020-01-06T04:38:59+5:302020-01-06T04:39:26+5:30

सुधारित नागरिकत्व कायद्यावरून (सीएए) लोकांची दिशाभूल करून राहुल गांधी व प्रियांका गांधी वाड्रा हे काँग्रेसचे नेते दंगली भडकवत आहेत,

Rahul, Priyanka Gandhi triggered riots | ''राहुल, प्रियांका गांधींनी दंगली भडकविल्या''

''राहुल, प्रियांका गांधींनी दंगली भडकविल्या''

नवी दिल्ली : सुधारित नागरिकत्व कायद्यावरून (सीएए) लोकांची दिशाभूल करून राहुल गांधी व प्रियांका गांधी वाड्रा हे काँग्रेसचे नेते दंगली भडकवत आहेत, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री व भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी येथे
केला आणि देशातील अल्पसंख्याकांचे नागरिकत्व हिरावून घेतले जाऊ शकेल अशी कोणतीही तरतूद या कायद्यात नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
दिल्ली विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील तालकटोरा स्टेडियमध्ये भरलेल्या बूथ पातळीवरील भाजपा कार्यकर्त्यांच्या शिबिरात अमित शहा बोलत होते. दोन दिवसांपूर्वी नानकाना साहिब गुरुव्दारावर संतप्त जमावाने केलेल्या हल्ल्याचा संदर्भ देत शीख समुदायाला भयभीत केले जात असल्याबद्दल पाकिस्तानवर टिका केली.

Web Title: Rahul, Priyanka Gandhi triggered riots