शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी अपात्रतेसाठी १५ दिवसांची मुदतवाढ, नार्वेकरांना दिला १५ फेब्रुवारीपर्यंत अवधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2024 08:37 IST

Rahul Narvekar: राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रताप्रकरणी निकाल देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना १५ फेब्रुवारीपर्यंत अवधी वाढवून दिला आहे.

नवी दिल्ली - राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रताप्रकरणी निकाल देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना १५ फेब्रुवारीपर्यंत अवधी वाढवून दिला आहे.

घटनेच्या दहाव्या परिशिष्टानुसार राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रताप्रकरणी अध्यक्ष नार्वेकर यांनी ३१ जानेवारीपर्यंत निकाल द्यावा, असे आदेश सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने ३० ऑक्टोबरला दिले होते. पण ही मुदत संपायला दोन दिवस उरले असताना नार्वेकर यांच्या वतीने २१ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा अर्ज सोमवारी सादर केला. याबाबत नार्वेकर यांनी लवकर निर्णय घ्यावा, अशी याचिका शरद पवार गटाचे जयंत पाटील यांनी केली आहे. राष्ट्रवादीप्रकरणी निकाल देण्यासाठी ३१ जानेवारीच्या मुदतीचे पालन करण्याबाबत नार्वेकर यांच्या वतीने सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी  ३ आठवड्यांची मुदत मागितली. त्यावर शरद पवार गटाने वकील अभिषेक सिंघवी यांनी आक्षेप घेतला.

निवडणूक आयोगाच्या निकालाची प्रतीक्षा- शिवसेना आमदार अपात्रताप्रकरणी निकाल देताना अध्यक्ष नार्वेकर यांना निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हाबाबत दिलेल्या निकालाचा आधार घेण्याची संधी मिळाली होती. - राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीवर पक्ष आणि चिन्हाविषयी निवडणूक आयोगाने अद्याप निकाल दिलेला नाही. आयोगाने याप्रकरणी ८ डिसेंबरला निकाल राखून ठेवला आहे.

टॅग्स :Rahul Narvekarराहुल नार्वेकरNCPराष्ट्रवादी काँग्रेसSupreme Courtसर्वोच्च न्यायालय