राहुल गांधी यांचा हरयाणातील मुक्काम रद्द; थेट दिल्लीला रवाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2023 07:28 IST2023-01-06T07:28:22+5:302023-01-06T07:28:58+5:30

सोनिया गांधी यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते दिल्लीला गेल्याचे सांगण्यात येत आहे.

Rahul Gandhi's stay in Haryana cancelled; Directly left for Delhi | राहुल गांधी यांचा हरयाणातील मुक्काम रद्द; थेट दिल्लीला रवाना

राहुल गांधी यांचा हरयाणातील मुक्काम रद्द; थेट दिल्लीला रवाना

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचा टप्पा आटोपून राहुल गांधींचीभारत जोडो यात्रा गुरुवारी सायंकाळी हरयाणा सीमेवर पोहोचली. मात्र, तेथे मुक्काम न करता राहुल गांधी तेथून दिल्लीला रवाना झाले. सोनिया गांधी यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते दिल्लीला गेल्याचे सांगण्यात येत आहे.

पक्षाच्या उत्तर प्रदेश प्रभारी प्रियांका गांधी गुरुवारीही यात्रेला उपस्थित राहू शकल्या नाहीत. सोनिया गांधी यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्या बुधवारीही यात्रेत सहभागी होऊ शकल्या नव्हत्या. दरम्यान, यात्रेचा उत्तर प्रदेशातील टप्पा पूर्ण झाला. शुक्रवारी सकाळपासून यात्रा पुन्हा सुरू होणार आहे. 

२०२३ मध्ये आणखी एक यात्रा
२०२३ मध्ये २६ जानेवारी ते २६ मार्च या कालावधीत पक्षाकडून अशीच आणखी एक यात्रा काढण्यात येणार आहे. ही यात्रा पूर्व-पश्चिम अशी असेल, असे पक्षाचे नेते जयराम रमेश यांनी सांगितले. 

Web Title: Rahul Gandhi's stay in Haryana cancelled; Directly left for Delhi