लडाखमध्ये रायडर लूकमध्ये दिसले राहुल गांधी! बाईकवरून पॅंगॉन्ग त्सो तलावावर पोहोचले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2023 12:24 IST2023-08-19T12:23:31+5:302023-08-19T12:24:01+5:30
काँग्रेस नेते राहुल गांधी गुरुवारी लडाख दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी बाईकवरुन प्रवास केला.

लडाखमध्ये रायडर लूकमध्ये दिसले राहुल गांधी! बाईकवरून पॅंगॉन्ग त्सो तलावावर पोहोचले
काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी लडाख दौऱ्यावर आहेत. आज सकाळी ते रायडर लूकमध्ये दिसले. त्यांनी पॅंगॉन्ग त्सो तलावापर्यंत त्यांनी बाईकवरुन राईड केली. त्यांच्या बाईक राईडचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये राहुल गांधी स्वतः बाइक चालवताना दिसत आहेत. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची २० ऑगस्ट रोजी जयंती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राहुल गांधी त्यांच्या वडिलांची जयंती पॅंगोंग त्सो तलावावरच साजरी करणार आहेत. कलम 370 आणि 35 (A) रद्द केल्यानंतर आणि जम्मू-काश्मीरपासून वेगळे झाल्यानंतर नवीन केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती झाल्यानंतर राहुल गांधी यांचा हा पहिलाच लडाख दौरा आहे.
Rahul Gandhi : "प्रत्येक संस्थेत RSS चे लोक, मंत्रालय पण..."; राहुल गांधींचा जोरदार हल्लाबोल
दरम्यान, लडाखच्या मुक्कामादरम्यान राहुल गांधी कारगिल स्मारकावर गेले होते. स्थानिक तरुणांशी संवाद साधणाऱ्या कार्यक्रमातही त्यांनी सहभाग घेतला. गांधी यांनी लेहमध्ये फुटबॉलचा सामनाही पाहिला. कॉलेजच्या काळात राहुल गांधी हे फुटबॉलपटू राहिले आहेत. याआधी ते २ दिवसांसाठी लडाखला पोहोचले होते, पण इथे पोहोचल्यानंतर त्यांनी आपला प्लॅन बदलला आणि २५ ऑगस्टपर्यंत केंद्रशासित प्रदेशात राहण्याचा निर्णय घेतला. ३० सदस्यीय लडाख ऑटोनॉमस हिल डेव्हलपमेंट कौन्सिल कारगिल निवडणुकीसाठी काँग्रेसच्या बैठकीतही ते उपस्थित राहणार आहेत.
कारगिल परिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सने भारतीय जनता पक्षाच्या (BJP) विरोधात आघाडी केली आहे. १० सप्टेंबर रोजी ही निवडणूक होत आहे. राहुल गांधी यांना बाईक चालवण्याची आवड आहे, याबाबत त्यांनी स्वतः सांगितले आहे. राहुल गांधी यांनी नुकतेच दिल्लीतील करोल बाग भागात मोटर मेकॅनिकशी संवाद साधला होता. यादरम्यान एका प्रश्नाच्या उत्तरात त्याने सांगितले की, त्यांना बाइक चालवायला खूप आवडते. राहुल गांधी म्हणाले होते, 'माझ्याकडे केटीएम बाईक आहे. पण ती तशीच पडून आहे. सुरक्षेमुळे मला चालवता येत नाही.
राहुल गांधी गुरुवारी लडाखला पोहोचले, तिथे लेह विमानतळावर पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. काँग्रेस गांधी यांनी या वर्षाच्या सुरुवातीला दोनदा श्रीनगर आणि जम्मूला भेट दिली. जानेवारीमध्ये काँग्रेस नेते त्यांच्या भारत जोडो दौऱ्यात जम्मू आणि श्रीनगरला गेले होते. फेब्रुवारीमध्ये त्यांनी पुन्हा गुलमर्ग स्की रिसॉर्टला वैयक्तिक भेट दिली. यावेळी त्यांनी तेथे उपस्थित अनेक पर्यटकांसोबत सेल्फीही घेतले.