राहुल गांधींच्या सभेत पुन्हा खाटांची पळवापळवी
By Admin | Updated: September 14, 2016 14:21 IST2016-09-14T14:20:29+5:302016-09-14T14:21:04+5:30
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या मिर्झापूर येथील सभेमध्ये बुधवारी पुन्हा एकदा खाटांची पळवापळवी झाली.

राहुल गांधींच्या सभेत पुन्हा खाटांची पळवापळवी
ऑनलाइन लोकमत
मिर्झापूर, दि. १४ - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या मिर्झापूर येथील सभेमध्ये बुधवारी पुन्हा एकदा खाटांची पळवापळवी झाली. सभा संपताच जमलेल्या गर्दीने खाटांची एकच पळवापळवी सुरु केली. खाटा तिथेच सोडून जा असे माईकवरुन वारंवार आवाहन करण्यात येत होते.
मात्र त्याकडे दुर्लक्ष करुन हाताला लागेल ती लाकडी खाट घेऊन घराच्या दिशेने लोक पळताना दिसत होते. मागच्या आठवडयात राहुल यांची उत्तरप्रदेशात देवरीया येथे खाट सभा पार पडली. त्यावेळी सुद्धा सभा संपातच जमलेल्या गर्दीने खाटांची पळवापळवी सुरु केली.
आणखी वाचा
उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी जनतेशी थेट खाट सभेच्या माध्यमातून संवाद साधत आहेत. मात्र मूळ विषयापेक्षा खाटांच्या पळवापळवीमुळे ही सभा जास्त चर्चेचा विषय ठरत आहे.
Mirzapur: Locals take away wooden cots while announcement says "Khaat chodke chale jao" after RGandhi public meet pic.twitter.com/mDjVquA08J
— ANI UP (@ANINewsUP) September 14, 2016