शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
4
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
5
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
6
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
7
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
8
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
9
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
10
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
11
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
12
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
13
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

राहुल गांधींचा बंगला रिकामा आहे, कृपया अर्ज करा; परिपत्रकानं खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 9:31 PM

लोकसभा सचिवालयाच्या परिपत्रकानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

नवी दिल्ली: लोकसभा सचिवालयाच्या एका परिपत्रकानं दिल्लीतील राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. सचिवालयानं खासदारांसाठी उपलब्ध असलेल्या बंगल्यांची एक यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये सध्या रिकामी असलेल्या बंगल्यांचा समावेश आहे. या यादीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या बंगल्याचाही समावेश असल्यानं दिल्लीत चर्चेला उधाण आलं आहे. राहुल गांधी लोकसभा निवडणुकीत विजयी झाले असतानाही त्यांचा बंगला रिकामा दाखवण्यात आल्यानं अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. आज लोकसभा सचिवालयानं खासदारांसाठी रिकामी असलेल्या बंगल्यांची यादी प्रसिद्ध केली. यामध्ये 12 तुघलक लेनचादेखील समावेश आहे. राहुल गांधी 2004 मधून याच बंगल्यात राहतात. राहुल गांधी ज्यावेळी पहिल्यांदा अमेठीतून जिंकले, तेव्हापासून ते 12 तुघलक लेनमध्ये वास्तव्यास आहेत. हा बंगला टाईप 8 प्रकारातला असून तो सर्वात मोठादेखील आहे. सचिवालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीतील बंगले खासदारांना दिले जातात. या यादीत खासदार असलेल्या राहुल यांच्या बंगल्याचा समावेश असल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे. खासदारांना सचिवालयाकडून देण्यात आलेल्या यादीत 517 बंगल्यांचा समावेश आहे. यातून खासदारांना बंगल्यांची निवड करायची आहे. यामध्ये राहुल यांच्या बंगल्याचा समावेश असल्यानं अनेकांना धक्का बसला. राहुल यांच्या कार्यालयाला या परिपत्रकाबद्दल कोणतीही माहिती नाही. राहुल गांधी यंदा अमेठी आणि वायनाडमधून निवडणूक लढले. अमेठीत भाजपा नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनी त्यांचा पराभव केला. मात्र वायनाडमधून राहुल गांधी विजयी झाले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसamethi-pcअमेठीwayanad-pcवायनाडSmriti Iraniस्मृती इराणीBJPभाजपा