शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

National Herald : राहुल गांधींची सलग तिसऱ्या दिवशी ईडी चौकशी सुरू, काँग्रेस कार्यकर्त्यांनी जाळले टायर; तोडले बॅरिकेड्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2022 14:41 IST

National Herald : आज हे काँग्रेसचे कार्यकर्ते हिंसक झाले आणि काही जणांनी टायर जाळून निषेध नोंदवला. तर काही कार्यकर्त्यांनी बॅरिकेट्स तोडले आहेत. 

नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणी सलग तिसऱ्या दिवशी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. त्याचवेळी दिल्लीत काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला आहे. काँग्रेस  खासदार राहुल गांधी यांना नॅशनल हेरॉल्ड आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीनं त्यांना काही दिवसांपूर्वीच समन्स बजावलं होतं. दरम्यान, राहुल गांधींची चौकशी राजकीय सुडभावनेतून केली जात असल्याचा आरोप करत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीत आंदोलन केले  आहे. आज हे काँग्रेसचे कार्यकर्ते हिंसक झाले आणि काही जणांनी टायर जाळून निषेध नोंदवला. तर काही कार्यकर्त्यांनी बॅरिकेट्स तोडले आहेत. 

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी ‘नॅशनल हेराल्ड’प्रकरणी ईडीकडून आठ तास चौकशी झाली. राहुल गांधी सकाळी ११.०५ वाजता मुख्यालयात हजर झाले होते. यावेळी त्यांची बहीण सरचिटणीस प्रियांका गांधी सोबत होत्या. ११.३० वाजता चौकशी सुरु झाली होती. चार तास चौकशीनंतर ३.३० वाजता ते घरी गेले. दुपारी ४.३० वाजता राहुल गांधी पुन्हा चौकशीसाठी हजर झाले. रात्री ८.३० पर्यंत ते ईडीच्या कार्यालयातच होते. बुधवारीही सलग तिसऱ्या दिवशी त्यांना चौकशीसाठी पुन्हा बोलविले होते. त्याप्रमाणे आज त्यांची ईडीच्या कार्यालयात चौकशी सुरु आहे.  

अधिकाऱ्यांनी सांगितले की, ईडीने सोमवारी राहुल गांधी यांची दहा तासांपेक्षा अधिक वेळ चौकशी केली होती. त्यानंतर ईडीने त्यांना मंगळवारी पुन्हा हजर होण्यास सांगितले होते. काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते यांनी दुसऱ्या दिवशीही निदर्शने केली होती. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीdelhiदिल्लीPoliceपोलिसEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयagitationआंदोलन