राज्यातील नेत्यांशी आज राहुल गांधींची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2019 06:32 IST2019-06-29T06:31:20+5:302019-06-29T06:32:44+5:30
लोकसभेतील दारुण पराभवानंतर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांशी राहुल गांधी शनिवारी चर्चा करणार आहेत.

राज्यातील नेत्यांशी आज राहुल गांधींची चर्चा
नवी दिल्ली - लोकसभेतील दारुण पराभवानंतर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांशी राहुल गांधी शनिवारी चर्चा करणार आहेत. विधानसभा निवडणुकीवरही बैठकीत चर्चा होईल. बैठकीस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील गटनेते शरद रणपिसे, पृथ्वीराज चव्हाण, खा. सुरेश धानोरकर व मल्लिकार्जुन खरगे उपस्थित राहतील.