शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी केंद्र सरकार पुरेसे गंभीर नाही, राहुल गांधींची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2020 10:30 PM

चीनमध्ये वेगाने पसरत असलेल्या कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जग चिंतेत आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव भारतासारख्या देशातही होण्याची धोका आहे.

नवी दिल्ली - चीनमध्ये वेगाने पसरत असलेल्या कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जग चिंतेत आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव भारतासारख्या देशातही होण्याची धोका आहे. दरम्यान, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कोरोना विषाणूवरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. कोरोना विषाणूच्या संकटाकडे केंद्र सरकार म्हणावे तसे गांभीर्याने पाहत नाही आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. चीनमधील वुहानमधून सुरुवात होऊन जगातील २५ हून अधिक देशात कोरोना विषाणूचा प्रसार झाला आहे. या विषाणूमुळे चीनमध्ये आतापर्यंत ११०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, या विषाणूच्या प्रतिबंधासाठी केंद्र सरकारकडून पुरेशा उपाययोजना केल्या गेल्या नसल्याचा आरोप राहुल गांधी यांनी ट्विट करून केला आहे. ''कोरोना विषाणूचा देशातील नागरिक आणि अर्थव्यवस्थेला धोका आहे. मात्र सरकारने या संकटाकडे पूरेसे गांभीर्याने पाहिलेले नाही. कोरोनाच्या प्रतिबंधासाठी त्वरित उपाययोजना होण्याची गरज आहे,''असे राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

दरम्यान, कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी पुरेशी दक्षता घेतली जात असल्याचे केंद्र सरकारने संसदेत सांगितले होते. तसेच चीनमधून येणाऱ्या लोकांकडे लक्ष ठेवण्यात येत आहे. त्याशिवाय वुहान येथून आलेल्या लोकांवर लष्कर आणि आयटीबीपीच्या केंद्रात ठेवून लक्ष ठेवले जात असल्याचे केंद्राने सांगितले होते. चीनमधील वुहानमधून पसरलेल्या कोरोना विषाणूमुळे सध्या संपूर्ण जगभरात भीतीचे वातावरण आहे. चीनमध्ये आतापर्यंत ४४ हजार जणांना या विषाणूची लागण झाली आहे. तसेच चीनबाहेरही या विषाणूमुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. चीनमध्ये सध्या भीषण परिस्थिती असून, या विषाणूचा फैलाव झालेल्या हुबेई प्रांताचा संपर्क चीनच्या इतर भागापासून तोडण्यात आला आहे. तसेच येथील नागरिकांना घरांमध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.   

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीCentral Governmentकेंद्र सरकारcorona virusकोरोनाIndiaभारतchinaचीन