शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

"चिनी सैन्य भारतात घुसले, चार टँक...!"; राहुल गांधींच्या दाव्यानं संसदेत मोठा गदारोळ! राजनाथ, शाह यांनी दिलं ओपन चॅलेन्ज! नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 15:50 IST

माजी लष्करप्रमुख नरवणे यांच्या पुस्तकावरून वाद...

सध्या लोकसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. दरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना डोकलामचा मुद्दा उपस्थित केला. यानंतर संसदेत मोठा गदारोळ सुरू झाला. राहुल गांधी यांनी डोकलामसंदर्भात भाष्य करताच, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तीव्र आक्षेप घेतला आणि 'राष्ट्रपतींच्या अभिभाषणात या मुद्दाचा कसलाही उल्लेख नाही', असे म्हणाले. राहुल गांधींनी संसदेत डोकलाम आणि चीनचा उल्लेख केल्यानंतर, राजनाथ सिंह यांनी त्यांच्या विधानाला विरोध करण्यास सुरुवात केली.

माजी लष्करप्रमुख नरवणे यांच्या पुस्तकावरून वाद -राहुल गांधी माजी लष्करप्रमुख नरवणे यांच्या न प्रकाशित झालेल्या पुस्तकाचा हवाला देत, त्यातील चीन आणि डोकलामसंदर्भातील  विधानांचा उल्लेख करू इच्छित होते. मात्र, राजनाथ सिंह यांनी यावर आक्षेप घेतला आणि राहुल गांधी ज्या पुस्तकाचा उल्लेख करत आहेत, ते कधीच प्रकाशित झाले नाही. राहुल यांचा संदर्भ चुकीचा आहे, असे सांगितले. यावर, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधींना रोखले आणि जे पुस्तक अद्याप प्रकाशितच झालेले नाही, त्यावर संसदेत चर्चा केली जाऊ शकत नाही, असे स्पष्ट केले.

गृहमंत्री अमित शाह यांचा आक्षेप -यानतंर, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही राहुल गांधींवर आक्षेप घेतला आणि 'हे पुस्तक प्रकाशित झाले आहे की नाही, हे राहुल गांधी यांनी सांगावे, असे म्हणाले. यावर, "सभागृहाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नका आणि अनावश्यक भाष्यही करू नका", असे राजनाथ सिंह म्हणाले.काय म्हणाले राहूल गांधी? -राहुल गांधी म्हणाले, उनका स्रोत प्रामाणिक आहे आणि यात (एक प्रकाशित मासिक) माजी आर्मी जनरल (एमएम नरवणे) यांच्या अप्रकाशित पुस्तकाचे कोट आहेत. एमएम नरवणे यांच्या रिपोर्टचा हवाला देत राहुल गांधी म्हणाले, चिनी सैन्याचे टँक भारतीय सीमेजवळ आले आणि चिनी सैन्याने भारतीय हद्दीत प्रवेश केला. चार चिनी टँक भारतीय सीमेत प्रवेश करत होते. चिनी सैन्याचे टँक कैलास पर्वतरांगावर चढत होते.

"सभागृह नियमांनुसार चालते" -विरोधकांवर निशाणा साधत राहूल म्हणाले, "हे लोक पुस्तकाला घाबरत आहेत. जर ते घाबरत नसतील तर त्यांनी मला ते वाचू द्यावे." यावर, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले, 'सभागृह नियमांनुसार चालते.'

English
हिंदी सारांश
Web Title : Rahul Gandhi's claim sparks uproar; Shah, Singh challenge in Parliament!

Web Summary : Rahul Gandhi's Doklam remarks in Parliament triggered a major uproar. Rajnath Singh and Amit Shah challenged his statements, citing an unpublished book. The Speaker intervened, emphasizing parliamentary rules.
टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीParliamentसंसदlok sabhaलोकसभाRajnath Singhराजनाथ सिंहAmit Shahअमित शाह