शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

निलंबनाच्या कारवाईविरोधात राहुल गांधींचे आंदोलन, व्यंकैय्या नायडूंनी दिला स्पष्ट नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2021 1:07 PM

राज्यसभेचे सभापती व्यंकैय्या नायडू यांनी पुन्हा एकदा खासदारांवर केलेली निलंबनाची कारवाई योग्य असल्याचे म्हटले आहे.

नवी दिल्ली:संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. सत्राच्या सुरुवातीलाच सभागृहात मोठ्या प्रमाणात गदारोळ पाहायला मिळाला. विरोधकांनी आजही राज्यसभेच्या 12 खासदारांचे निलंबन मागे घेण्याची मागणी केली आहे. निलंबन मागे घेण्यासाठी विरोधकांनी संसदेच्या आवारातील गांधी पुतळ्यासमोर आंदोलन केले. या आंदोलनात राहुल गांधीदेखील सहभागी झाले होते.

खासदारांनी माफी मागावी-व्यंकैय्या नायडूदरम्यान, राज्यसभेचे सभापती व्यंकैय्या नायडू यांनी पुन्हा एकदा खासदारांवर केलेली निलंबनाची कारवाई योग्य असल्याचे म्हटले आहे. विरोधी पक्षाने संसदेचे सत्रात गदारोळ घालू नये, ही निलंबनाची पहिलीच वेळ नसून, याआधी देखील निलंबन करण्यात आले असल्याचे सभापती म्हणाले. तसेच, निलंबित खासदारांनी राज्यसभेत माफी मागावी त्यानंतरच त्यांचे निलंबन मागे घेण्यात येईल असे देखील नायडू म्हणाले.

विरोधकांच्या आंदोलनात राहुल गांधींचा सहभागराज्यसभेच्या 12 सदस्यांना निलंबित केल्यानंतर विरोधी पक्षाने जोरदार आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. त्या आंदोलनात काँग्रेस नेते राहुल गांधी देखील सहभागी झाले होते. यावेळी सर्व नेत्यांनी हाताला काळी पट्टी बांधत निलंबनाच्या कारवाईचा निषेध केला. तसेच माफी मागणार नसल्याचे ठामपणे सांगितले.

विरोधकांचा सभात्यागराज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी महागाई आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उपसभापती हरिवंश यांच्याशी चर्चा करण्याची मागणी केली. परवानगी न मिळाल्याने काँग्रेस खासदारांनी सभागृहातून सभात्याग केला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, आरजेडी, टीआरएस आणि आययूएमएलनेही राज्यसभेतून सभात्याग केला.

पावसाळी अधिवेशनातील कृत्यामुळे निलंबनसंसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभेच्या 12 खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी(11 ऑगस्ट) केलेल्या गैरवर्तनामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. निलंबन झालेल्या खासदारांमध्ये एल्माराम करीम (माकप), फुल्लो देवी नेताम (काँग्रेस), छाया वर्मा (काँग्रेस), रिपून बोरा (काँग्रेस), बिनॉय बिस्वाम (सीपीआय), राजमणी पटेल (काँग्रेस), डोला सेन (तृणमूल काँग्रेस), शांत छेत्री (तृणमूल काँग्रेस), सय्यद नासीर हुसेन (काँग्रेस), प्रियंका चतुर्वेदी (शिवसेना), अनिल देसाई (शिवसेना) आणि अखिलेश प्रसाद सिंग (काँग्रेस) यांचा समावेश आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाVenkaiah Naiduव्यंकय्या नायडूParliamentसंसद