राहुल गांधी अयोध्येतील राम मंदिरात दर्शनाला जाणार नाहीत; काँग्रेसकडून स्पष्ट, भाजपाची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 11:16 IST2026-01-23T11:15:13+5:302026-01-23T11:16:32+5:30

Rahul Gandhi Ayodhya Ram Mandir News: राहुल गांधी अयोध्येतील राम मंदिराला भेट देऊ शकणार नाहीत.

rahul gandhi will not visit ram temple in ayodhya congress make it clear bjp criticizes | राहुल गांधी अयोध्येतील राम मंदिरात दर्शनाला जाणार नाहीत; काँग्रेसकडून स्पष्ट, भाजपाची टीका

राहुल गांधी अयोध्येतील राम मंदिरात दर्शनाला जाणार नाहीत; काँग्रेसकडून स्पष्ट, भाजपाची टीका

Rahul Gandhi Ayodhya Ram Mandir News: अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या लोकार्पणाला दोन वर्षे पूर्ण झाली. गेल्या दोन वर्षांत सुमारे १० कोटी भाविकांनी राम दर्शन घेतल्याचे म्हटले जात आहे. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह अनेक मुख्यमंत्री, नेते, मंत्री यांनी अयोध्येत जाऊन बालकरामाचे दर्शन घेतले. काही दिवसांपूर्वी काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधीअयोध्याराम मंदिरात जाणार असल्याचे सांगितले गेले होते. परंतु, आता मात्र राहुल गांधी राम मंदिरात जाणार नसल्याची माहिती मिळाली आहे. 

काँग्रेस खासदार तनुज पुनिया यांनी सांगितले होते की, राहुल गांधी लवकरच अयोध्येतील राम मंदिराला भेट देतील. जेव्हा राम मंदिराचे लोकार्पण झाले तेव्हा राहुल गांधींनी स्वतःहून सांगितले होते की, राम मंदिराचे बांधकाम अद्याप पूर्ण झालेले नाही, म्हणून ते अपूर्ण मंदिराला भेट देणार नाहीत. राम मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यावर ध्वजारोहण झाल्यावर राहुल गांधी राम मंदिराला भेट देणार होते, असे सांगितले गेले. आता राम मंदिरावर ध्वज फडकवण्यात आला आहे. राम मंदिर पूर्ण झाले आहे. राहुल गांधी आता रामललाच्या दर्शनासाठी अयोध्येला जातील, असे म्हटले जात आहे. 

राहुल गांधी अयोध्येतील राम मंदिरात दर्शनाला जाणार नाहीत

राहुल गांधी अयोध्येतील राम मंदिराला भेट देऊ शकणार नाहीत. काँग्रेस सूत्रांनी स्पष्ट केले की, पूर्वनियोजित कामांमुळे ते राम मंदिराला भेट देणार नाहीत. राहुल गांधी मनरेगा योजनेत सहभागी असलेल्या कामगारांना भेटणार आहेत. तसेच काँग्रेस नेत्यांची एक महत्त्वाची बैठकही पार पडणार आहे. 

दरम्यान, भाजप नेते आणि प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला. राहुल गांधी आणि काँग्रेस कुटुंबाने सातत्याने हिंदूविरोधी भूमिका स्वीकारली आहे. काँग्रेसने राम मंदिराच्या बांधकामाला विरोध केला होता. प्रभू श्रीरामांना काल्पनिक म्हणून वर्णन केले. अयोध्या किंवा महाकुंभमेळ्यासारख्या धार्मिक कार्यक्रमांपासून स्वतःला दूर ठेवले. राहुल गांधी फक्त निवडणुका जवळ आल्यावरच श्रीरामांचे स्मरण करतात. परंतु प्रत्यक्षात त्यांच्या विचारसरणीत हिंदू श्रद्धेला स्थान नाही.

 

Web Title : राहुल गांधी अयोध्या राम मंदिर नहीं जाएंगे; कांग्रेस का स्पष्टीकरण, भाजपा की आलोचना।

Web Summary : कांग्रेस ने स्पष्ट किया कि राहुल गांधी पूर्व निर्धारित कार्यों के कारण अयोध्या के राम मंदिर नहीं जाएंगे। भाजपा ने गांधी पर हिंदू विरोधी रुख अपनाने और केवल चुनावों के दौरान भगवान राम को याद करने का आरोप लगाया।

Web Title : Rahul Gandhi won't visit Ayodhya Ram Mandir; Congress clarifies, BJP criticizes.

Web Summary : Rahul Gandhi will not visit Ayodhya's Ram Mandir due to prior commitments, Congress clarified. BJP criticized Gandhi, accusing him of anti-Hindu stance and only remembering Lord Rama during elections.