शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
3
'मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली'; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
4
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
5
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
6
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
7
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
8
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
9
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
10
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
11
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
12
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
13
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
14
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
15
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
16
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
17
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...
18
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
19
'ही' साऊथ अभिनेत्री, जी प्रेमासाठी बनली वयानं २७ वर्ष मोठ्या असलेल्या माजी CM ची दुसरी पत्नी
20
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल

राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष होते, आहेत आणि राहतील, रणदीप सुरजेवाला यांचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2019 3:47 PM

लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती. राहुला गांधी यांनी उचललेल्या या पावलानंतर काँग्रेसमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र काँग्रेसने राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वास दर्शवला असून, राहुल गांधी हेच काँग्रेसचे अध्यक्ष होते, आहेत आणि राहतील, असे काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पक्षाच्या कोअर ग्रुपच्या बैठकीनंतर स्पष्ट केले आहे. सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला केवळ ५२ जागांवर समाधान मानावे लागले होते. या पराभावनंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. तसेच काँग्रेस नेत्यांनी केलेल्या विनंतीनंतरही ते आपल्या निर्णयावर ठाम राहिले होते. मात्र काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांकडून त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू होते. दरम्यान, ये प्रयत्न यशस्वी ठरल्याचे मानले जात आहे. दरम्यान, सतराव्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनापूर्वी आज काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक दिल्लीत झाली. या बैठकीला अध्यक्ष राहुल गांधी आणि माजी अध्यक्षा सोनिया गांधी उपस्थित नव्हत्या. ज्येष्ठ नेते ए. के. अँटोनी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस जयराम रमेश, गुलाम नबी आझाद, मल्लिकार्जुन खर्गे उपस्थित होते.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस