शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

"सच कितनी खूबी से सामने आता है..."; नरेंद्र मोदी स्टेडियमवरून राहुल गांधींचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2021 21:42 IST

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या सस्ते बुधवारी जगातील सर्वात मोठ्या आणि अत्यधुनिक क्रिकेट स्टेडियमचे उद्घघाटन करण्यात आले. आता याचे नाव सरदार पटेल स्टेडियमऐवजी नरेंद्र मोदी स्टेडियम करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदींनीच गुजरातचे मुख्यमंत्री असताना या स्टेडियमची संकल्पना तयार केली होती.( Narendra Modi stadium)

नवी दिल्ली - गुजरातमधील जगातील सर्वात मोठ्या आणि अत्यधुनिक क्रिकेट स्टेडियमच्या नावावरून वाद सुरू आहे. यासंदर्भात आता राहुल गांधींनीही (Rahul Gandhi) भाष्य केले आहे. यामुळे या वादाला आणखीनच हवा मिळताना दिसत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ram Nath Kovind) यांच्या सस्ते बुधवारी जगातील सर्वात मोठ्या आणि अत्यधुनिक क्रिकेट स्टेडियमचे उद्घघाटन करण्यात आले. आता याचे नाव सरदार पटेल स्टेडियमऐवजी नरेंद्र मोदी स्टेडियम (Narendra Modi Stadium) करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदींनीच गुजरातचे मुख्यमंत्री असताना या स्टेडियमची संकल्पना तयार केली होती. (Rahul Gandhi taunt over Narendra Modi stadium)

यासंदर्भात, राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे, की "सत्य किती चांगल्या प्रकारे समोर येते. नरेंद्र मोदी स्टेडियम - अडानी अँड - रिलायन्स अँड जय शाह यांच्या अध्यक्षतेखाली! #HumDoHumareDo."

पंडित नेहरूंचा 'भारतरत्न' सन्मान ते क्रिकेट स्टेडियमला नरेंद्र मोदींचं नाव... परंपरा To Be Continued!

आधी स्टेडियमला होते सरदार पटेलांचे नाव -राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ज्या स्टेडियमचे उद्घाटन करण्यात आले, त्या स्टेडियमला आधी सरदार पटेलांचे नाव देण्यात आले होते. मात्र, आता या स्टेडियमचे नाव पंतप्रधानांच्या नावाने, नरेंद्र मोदी स्टेडियम करण्यात आले आहे. यामुळेच काँग्रेसने भाजप आणि पंतप्रधानांना निशाण्याव घेतले आहे.

राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्याने काँग्रेसमध्ये अस्वस्थता; आता 'या' मोठ्या नेत्यानं दिली समज

स्टेडियमला का दिलं नरेंद्र मोदींचं नाव? -काँग्रेस नेते याला सरदार पटेलांचा अपमान असल्याचे म्हणत आहेत, तर केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी यासंदर्भात बोलताना म्हटले आहे, की "आम्ही या स्टेडियमचे नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हा मोदींचा एक ड्रिम प्रोजेक्ट होता. गुजरातचे मुख्यमंत्रीपद भूषवत असताना त्यांनी हे स्पप्न पाहिले होते. जे आता साकार झाले आहे. नवे स्टेडियमला जगातील सर्वात मोठ्या आणि सर्वात हायटेक स्टेडियमच्या धर्तीवर उभारण्यात आले आहे. अहमदाबाद आता स्पोर्ट्स सिटीच्या नावानेही ओळखले जाईल."

आत्मनिर्भर बनिये... स्टेडियमच्या नामांतरावरुन मिम्स, ट्विटरवर मोदी ट्रेंड

असं आहे नरेंद्र मोदी स्टेडियम -मोटेराच्या नवनिर्मित स्टेडियममध्ये खेळाडूंसाठी तब्बल चार ड्रेसिंग रूम आहेत. याशिवाय एलईडी लाईट्‌सचा वापर करण्यात आल्याने चेंडूवर नजर स्थिरावणे खेळाडूंना सोपे जाणार आहे. रात्रीच्यावेळीही खेळाडू हवेत आणि आकाशात चेंडू सहजपणे पाहू शकतील. जगातील सर्वांत मोठ्या स्टेडियममध्ये तब्बल ११ मध्यवर्ती खेळपट्ट्या आहेत. याशिवाय जिमसह चार ड्रेसिंग रूम्स आहेत. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीNarendra Modi Stadiumनरेंद्र मोदी स्टेडियम