"सरकार आता आणखी एक नवीन टॅक्स स्लॅब आणणार", राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 18:40 IST2024-12-07T18:36:41+5:302024-12-07T18:40:20+5:30

Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर नवीन टॅक्स स्लॅब संदर्भात एक पोस्ट केली आहे.

rahul gandhi targeted the government government is going to introduce new tax slab | "सरकार आता आणखी एक नवीन टॅक्स स्लॅब आणणार", राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा 

"सरकार आता आणखी एक नवीन टॅक्स स्लॅब आणणार", राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा 

नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर नवीन टॅक्स स्लॅब संदर्भात एक पोस्ट केली आहे. यात, भांडवलदारांना सवलती देऊन सर्वसामान्यांची लूट करण्याचे आणखी एक उदाहरण पहा. एकीकडे कॉर्पोरेट टॅक्सच्या तुलनेत इन्कम टॅक्समध्ये सातत्याने वाढ होत आहे, तर दुसरीकडे मोदी सरकार गब्बर सिंग टॅक्समधून अधिक वसूल करण्याच्या तयारीत आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

राहुल गांधी म्हणाले की, असे ऐकण्यात येत आहे की, जीएसटीच्या वाढत्या संकलनादरम्यान, सरकार एक नवीन टॅक्स स्लॅब आणणार आहे - आपल्याला आवश्यक असलेल्या गोष्टींवर जीएसटी वाढवण्याची योजना आहे. तसेच, जरा विचार करा - सध्या लग्नाचा हंगाम सुरू आहे, लोक पैसे जमा करत आहेत आणि दरम्यान सरकार 1500 रुपयांच्या वरच्या कपड्यांवरील जीएसटी 12 टक्क्यांवरून 18 टक्क्यांपर्यंत वाढवणार आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

हा घोर अन्याय आहे. अब्जाधीशांना टॅक्समध्ये सवलत देण्यासाठी आणि त्यांची मोठी कर्जे माफ करण्यासाठी गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांच्या कष्टाने कमावलेल्या पैशाची लूट केली जात आहे, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला. तसेच, आमचा लढा या अन्यायाविरुद्ध आहे. सर्वसामान्य जनतेवर टॅक्सच्या बोजा टाकण्याच्या विरोधात आम्ही जोरदार आवाज उठवू आणि ही लूट थांबवण्यासाठी सरकारवर दबाव आणू, असे राहुल गांधी यांनी म्हणत केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

Web Title: rahul gandhi targeted the government government is going to introduce new tax slab

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.