"सवाल करो तो जेल है, मोदी सरकार.... है", गाळलेल्या जागा भरा म्हणत राहुल गांधींचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2021 18:43 IST2021-07-06T18:42:47+5:302021-07-06T18:43:35+5:30
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा राफेल करारावरुन केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

"सवाल करो तो जेल है, मोदी सरकार.... है", गाळलेल्या जागा भरा म्हणत राहुल गांधींचा हल्लाबोल
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा राफेल करारावरुन केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यासोबत त्यांनी पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरावरुन तसंच सरकारी कंपन्यांच्या खासगीकरणाच्या मुद्द्यावरुन मोदींवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी एक ट्विट केलं असून कवितेच्या माध्यमातून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
राहुल गांधी यांनी गाळलेल्या जागा भरा म्हणत एक चारोळी ट्विट केली आहे. "मित्रों वाला राफेल है, टैक्स वसुली-महंगा तेल है, PSU-PSB की अंधी सेल है, सवाल करो तो जेल है, मोदी सरकार..... है!", असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे.
Fill in the blank:
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 6, 2021
‘मित्रों’ वाला राफ़ेल है
टैक्स वसूली- महंगा तेल है
PSU-PSB की अंधी सेल है
सवाल करो तो जेल है
मोदी सरकार ____ है!
राहुल गांधी यांनी याआधी देखील राफेल प्रकरण, पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किमती, कोरोना व्हायरस, ऑक्सिजन संकट, खासगीकरण आणि अर्थव्यवस्थेवरुन मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. वाढत्या महागाईचं संकट दिवसेंदिवस वाढत असताना पेट्रोलचे दर देशात १०० रुपये प्रतिलीटरच्या पलिकडे गेले आहेत.