राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 06:10 IST2025-05-06T06:10:29+5:302025-05-06T06:10:52+5:30

देशाला युद्ध सज्जतेचा इशारा दिलेला असताना पंतप्रधान नरेंद्र माेदी आणि राहुल गांधी यांची ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. 

Rahul Gandhi suddenly arrives at PMO; holds meeting with PM Modi | राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक

राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सोमवारी अचानक पंतप्रधान कार्यालयात दाखल झाले. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढलेला असताना आणि देशाला युद्ध सज्जतेचा इशारा दिलेला असताना पंतप्रधान नरेंद्र माेदी आणि राहुल गांधी यांची ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. 

पीएमओमध्ये सीबीआय संचालक नियुक्तीसाठी नेमलेल्या समितीच्या पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला ते उपस्थित राहिले. सरन्यायाधीश संजीव खन्नाही उपस्थित होते. सीबीआयचे विद्यमान संचालक प्रवीण सूद यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ २५ मे रोजी समाप्त होत आहे. तत्पूर्वी ही बैठक झाली. 

अशी होते नियुक्ती
सीबीआय संचालकांची नेमणूक केली जात असताना मंत्रिमंडळाने नियुक्त केलेली समिती शिफारस करते. यात पंतप्रधान, देशाचे सरन्यायाधीश व लोकसभेतील विरोधी पक्षनेत्यांचा समावेश असतो. समिती एका नावावर चर्चा करून तशी शिफारस केंद्र सरकारकडे करते.

Web Title: Rahul Gandhi suddenly arrives at PMO; holds meeting with PM Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.