...राहुल गांधींनी रस्त्याच्या मधोमध खेळण्यास सुरू केले क्रिकेट; गोलंदाजी पाहण्यासाठी झाली गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2022 01:49 PM2022-11-03T13:49:58+5:302022-11-03T13:55:17+5:30

गेल्या काही दिवसापासून काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरू आहे. ही त्रा चार राज्यातून गेली आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेला हा प्रवास आता तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेशमार्गे तेलंगणापर्यंत पोहोचला आहे.

Rahul Gandhi started playing cricket in the middle of the road video viral | ...राहुल गांधींनी रस्त्याच्या मधोमध खेळण्यास सुरू केले क्रिकेट; गोलंदाजी पाहण्यासाठी झाली गर्दी

...राहुल गांधींनी रस्त्याच्या मधोमध खेळण्यास सुरू केले क्रिकेट; गोलंदाजी पाहण्यासाठी झाली गर्दी

Next

गेल्या काही दिवसापासून काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरू आहे. ही त्रा चार राज्यातून गेली आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेला हा प्रवास आता तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेशमार्गे तेलंगणापर्यंत पोहोचला आहे. काल बुधवारी राहुल गांधी यांची रंजक शैली पाहायला मिळाली. यामध्ये ते क्रिकेट खेळताना दिसले. एक मुलगा फलंदाजी करत होता, तर राहुल गांधी गोलंदाजी करत असल्याचे दिसले. राहुल गांधी यांची गोलंदाजी पाहण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांसह आजूबाजूला लोकांची झुंबड उडाली होती.

हा व्हिडिओ राहुल गांधींनीही त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये राहुल गांधी गोलंदाजी करताना दिसत आहेत. बाजूला लोकांनी गर्दी जमली आहे. टीम इंडियाचा टी-शर्ट घातलेला एक लहान मुलगा फलंदाजी करत आहे. यानंतर राहुल गांधी यांनी त्याच्या क्रिकेट बॅटवर ऑटोग्राफही दिला. या व्हिडिओसह राहुल गांधी यांनी एक कॅप्शन दिली आहे. "भारताची जर्सी घालता तेव्हा काय होते ते तुम्ही पाहता - ते तुम्हाला अजब बनवते. वेल प्लेड #TeamIndia", असं यात म्हटले आहे. 

बुधवारी बांगलादेशविरुद्धच्या T20 विश्वचषक सामन्यात भारताचा ५ धावांनी विजय झाल्यानंतर राहुल गांधींनी हा व्हिडिओ त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. या व्हिडिओकडे भारतीय क्रिकेट संघाचा अभिनंदनाचा संदेश म्हणूनही पाहिले जात आहे. 

भारत जोडा यात्रेतील राहुल गांधी यांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. 

‘भारत जोडो’त समविचारी पक्षांना सहभागी करा; काँग्रेसच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांची सूचना

 काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेच्या पार्श्वभूमीवर अनुसूचित जाती विभागाची बैठक पक्ष निरीक्षक प्रशांत पवार यांच्या उपस्थितीत घेण्यात येऊन त्यात समविचारी पक्षांना या यात्रेत सहभागी करून घेण्याबाबत आवाहन करण्याचे ठरविण्यात आले. 

काँग्रेस भवनात झालेल्या या बैठकीत प्रारंभी गुजरातच्या मोरबी येथे झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजंली अर्पण करण्यात आली, तसेच अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची बहुमताने निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. यावेळी पक्ष निरीक्षक पवार यांनी, भारत जोडो यात्रेत तीन प्रकारचे यात्री सहभागी आहेत. त्यात भारत यात्री, राज्य यात्री आणि जिल्हा यात्री अशा पद्धतीने विभाग आहेत. 

 

Web Title: Rahul Gandhi started playing cricket in the middle of the road video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.