राहुल गांधींना पोलिसांकडून विशेष सुरक्षा
By Admin | Updated: July 30, 2015 23:14 IST2015-07-30T23:14:06+5:302015-07-30T23:14:06+5:30
पुणे : पुणे दौ-यावर असलेल्या कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या दौ-यासाठी पोलिसांनी सुरक्षेच्या विशेष उपाययोजना केल्या असून त्यांच्यासोबतच्या सुरक्षारक्षकांसोबतच पोलिसांच्या विशेष सुरक्षा पथकाचे जवानही तैनात असणार आहे.

राहुल गांधींना पोलिसांकडून विशेष सुरक्षा
प णे : पुणे दौ-यावर असलेल्या कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या दौ-यासाठी पोलिसांनी सुरक्षेच्या विशेष उपाययोजना केल्या असून त्यांच्यासोबतच्या सुरक्षारक्षकांसोबतच पोलिसांच्या विशेष सुरक्षा पथकाचे जवानही तैनात असणार आहे. गांधी शुक्रवारी कॉंग्रेस भवनला भेट देणार आहेत. तेथील कार्यक्रमानंतर ते एफटीआयआयला भेट देणार आहेत. गजेंद्र चौहाण यांच्या नियुक्तीच्या विरोधात आंदोलन करीत असलेल्या विद्यार्थ्यांची राहुल गांधी भेट घेणार आहेत. त्यासाठी पोलिसांनी दोन्ही ठिकाणी कडेकोट बंदोबस्ताची आखणी केली. गांधी यांना झेड प्लस सुरक्षा आहे. यासोबतच स्थानिक पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे. तसेच विशेष सुरक्षा पथक (एसपीयु) चे पथकही त्यांच्यासोबत असणार आहे. कार्यक्रमापुर्वी दोन्ही ठिकाणांची पाहणी करुन पोलीस तपासणी करणार आहेत. जागोजाग संशयीतांवर लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे विशेष शाखेचे उपायुक्त श्रीकांत पाठक यांनी सांगितले.