पहिल्यांदा मध्य प्रदेशचं सरकार पाडलं अन् आता राजस्थानात प्रयत्न, म्हणून आम्ही आत्मनिर्भर- राहुल गांधी 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2020 02:04 PM2020-07-21T14:04:32+5:302020-07-21T14:04:58+5:30

जुलैमध्ये राजस्थान सरकार खाली आणण्याचा त्यांनी अयशस्वी प्रयत्न केला. म्हणूनच कोरोनाविरुद्धच्या लढ्यात हा देश आत्मनिर्भर आहे.

rahul gandhi slam modi govt over pandemic says that is why we are aatmanirbhar | पहिल्यांदा मध्य प्रदेशचं सरकार पाडलं अन् आता राजस्थानात प्रयत्न, म्हणून आम्ही आत्मनिर्भर- राहुल गांधी 

पहिल्यांदा मध्य प्रदेशचं सरकार पाडलं अन् आता राजस्थानात प्रयत्न, म्हणून आम्ही आत्मनिर्भर- राहुल गांधी 

Next

कॉंग्रेस नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी सातत्यानं केंद्र सरकारवर हल्लाबोल करत आहेत. मंगळवारी त्यांनी कोरोना काळातील सरकारच्या कामगिरीचा उल्लेख करत मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. ते म्हणाले की, सरकारने फेब्रुवारीमध्ये नमस्ते ट्रम्पचं आयोजन केलं आणि मार्चमध्ये मध्य प्रदेशात सरकार पाडले, जुलैमध्ये राजस्थान सरकार खाली आणण्याचा त्यांनी अयशस्वी प्रयत्न केला. म्हणूनच कोरोनाविरुद्धच्या लढ्यात हा देश आत्मनिर्भर आहे.

राहुल यांनी ट्विट करून म्हटले आहे की, 'कोरोना कालावधीत सरकारची कामगिरी: फेब्रुवारी-नमस्ते ट्रम्प, मार्च- मध्य प्रदेशात सरकार पाडलं, मे- मेणबत्ती जाळली, मे- सरकारचा 6वा वर्धापन दिन साजरा, जून- बिहारमध्ये आभासी मेळावा आणि जुलै-राजस्थान सरकार पाडण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच कोरोनाच्या युद्धात देश 'आत्मनिर्भर' आहे. ' त्याआधी रविवारी राहुल गांधी म्हणाले होते की, कोरोना विषाणूची लागण आणि त्यामुळे होणा-या मृत्यूच्या आकडेवारीबाबत भाजपा सरकार खोटे बोलत आहे. सरकार जीडीपी आणि चिनी आक्रमणांबद्दलही खोटी माहिती देत आहे. राष्ट्रीय स्तरावरील सर्वच महत्त्वाच्या विषयांवर केंद्र सरकार खोटे बोलत आहे. ते म्हणाले की, सरकार राष्ट्रीय महत्त्वाच्या सर्व मुद्द्यांवर खोटे बोलत आहे आणि लवकरच भाजपकडून पसरलेला गोंधळ दूर होईल. त्यांनी ट्वीट करून म्हटले होते की, 'भाजपाने खोटेपणाला संस्थागत स्थान दिले आहे. 
कोरोनाची चाचणी संख्या कमी करून आणि त्यातून मृत्यूची संख्या कमी दाखवून, जीडीपी मोजण्यासाठी नवीन पद्धत अवलंबून आणि चिनी आक्रमणांवर मीडियाला धमकावून भाजपा सरकार गोंधळ वाढवत आहे. भारताला याची किंमत चुकवावी लागणार आहे. 

राहुल गांधींनी आपल्या ट्विटद्वारे वॉशिंग्टन पोस्टची बातमी शेअर केली. या अहवालात वृत्तपत्रात भारतात कोरोनामुळे होणा-या कमी मृत्यूचे रहस्यमय असल्याचे वर्णन केले आहे. वृत्तपत्राने लिहिले आहे की, भारतात कोरोना प्रकरणांची संख्या 1 दशलक्षांवर पोहोचली आहे. याद्वारे भारत अशा देशांच्या यादीत सामील झाला आहे जिथे कोणालाही अमेरिका आणि ब्राझील बरोबर जायचे नाही.

हेही वाचा

पाकिस्तानचा चीनला दे धक्का; बिगो अ‍ॅप बॅन, आता टिकटॉकवर टांगती तलवार

माइन्समध्ये लपलेल्या शत्रूलाही शोधून करणार ठार, 'या' तंत्रज्ञानानं भारताचे टी-90 टँक सुसज्ज

चाबहार रेल्वे प्रकल्पातून भारताला वगळलं ही तर अफवा; इराणनं केलं स्पष्ट

देशात राहणार आता फक्त ५ सरकारी बँका; मोदी सरकार भागीदारी विकणार

आनंदवार्ता! परीक्षेशिवाय मिळणार नोकरी; कोर्टात निघाली भरती

दररोज 3GB डेटा देणारे तीन कंपन्यांचे सर्वात स्वस्त प्लॅन; जाणून घ्या सर्वकाही

"सत्तेसाठी मोदी ताकदवान नेता असल्याची खोटी प्रतिमा पसरवली; आता तीच ठरतेय भारताची दुर्बलता"

Web Title: rahul gandhi slam modi govt over pandemic says that is why we are aatmanirbhar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.