दररोज 3GB डेटा देणारे तीन कंपन्यांचे सर्वात स्वस्त प्लॅन; जाणून घ्या सर्वकाही

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 02:41 PM2020-07-20T14:41:54+5:302020-07-20T14:44:03+5:30

जिओ, एअरटेल आणि व्होडाफोनच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 3 जीबी डेटा व्यतिरिक्त मोफत कॉलिंगचा फायदा मिळेल.

cheapest recharge plan offering daily 3gb data | दररोज 3GB डेटा देणारे तीन कंपन्यांचे सर्वात स्वस्त प्लॅन; जाणून घ्या सर्वकाही

दररोज 3GB डेटा देणारे तीन कंपन्यांचे सर्वात स्वस्त प्लॅन; जाणून घ्या सर्वकाही

Next

जर आपला दररोज जास्त डेटा खर्च होत असेल तर आम्ही आपल्याला रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोनचे दररोज 3 जीबी डेटा प्लॅनसंदर्भात माहिती देणार आहोत. या प्लॅन्समध्ये दररोज 3 जीबी डेटा देणारा सर्वात स्वस्त प्लॅन कोणता, याची माहितीही आम्ही देणार आहोत. जिओ, एअरटेल आणि व्होडाफोनच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 3 जीबी डेटा व्यतिरिक्त मोफत कॉलिंगचा फायदा मिळेल. याशिवाय तुम्हाला निश्चित मर्यादेमध्ये एसएमएस पाठविण्याची सुविधा मिळेल. तसेच या प्लॅनमध्ये अ‍ॅप्सची सदस्यता देखील विनामूल्य आहे. तर मग जाणून घेऊया त्यांच्यापैकी कोणती योजना सर्वात स्वस्त आहे ...

एअरटेल, व्होडाफोनची दररोजच्या खर्चानुसार स्वस्त योजना
जर आपण दररोज 3 जीबी डेटा देणा-या रिचार्ज प्लॅनबद्दल चर्चा करत असाल तर रिलायन्स जिओच्या अशा 3 योजना आहेत. एअरटेल आणि व्होडाफोनचा दररोज 3 जीबी डेटा देणारे 2-2 रिचार्ज प्लॅन आहेत. दररोज होणा-या खर्चानुसार एअरटेल आणि व्होडाफोनचा 3 जीबी डेटा देण्याचा प्लॅन स्वस्त आहे. याशिवाय एअरटेल आणि व्होडाफोनच्या या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंगचा फायदा आहे. Jio च्या योजनेत Jio to Jio कॉलिंग विनामूल्य आहे.


एअरटेलच्या दररोज 3 जीबी डेटा प्लॅनची वैशिष्ट्ये

एअरटेलकडे दररोज 3 जीबी डेटा देण्याचे दोन प्लॅन आहेत. पहिला प्लॅन 558 रुपयांच्या रिचार्जवर मिळतो. या प्लॅनची वैधता 56 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये दररोजचा खर्च 9.96 रुपये येतो. प्लॅनमध्ये एकूण 168 जीबी डेटा उपलब्ध आहे. याशिवाय दररोज 100 एसएमएस पाठविण्याची सुविधा आहे. प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना कोणत्याही नेटवर्कवर विनामूल्य कॉल करण्याचा लाभ मिळतो. या व्यतिरिक्त Airtel Xstream प्रीमियमचं ​​मोफत सब्सक्रिप्शन मिळते.
दररोज 3 जीबी डेटा देणारा एअरटेलचा दुसरा प्लॅन 398 रुपयांचा आहे. या प्लॅनची वैधता 28 दिवसांची आहे. प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना एकूण 84GB डेटा मिळतो. प्लॅनवर प्रत्येक दिवशी 14.21 रुपये खर्च येतो. वापरकर्त्यांना दररोज 100 एसएमएसचा लाभ आणि कोणत्याही नेटवर्कवर विनामूल्य कॉलिंग मिळते. या व्यतिरिक्त Airtel Xstream प्रीमियमचं ​​मोफत सब्सक्रिप्शन मिळते.

व्होडाफोनच्या प्लॅनवरही दररोज 9.9 रुपये खर्च
व्होडाफोनचे दररोज 3 जीबी डेटा देणारे 2 प्लॅन देखील आहेत. पहिला प्लॅन 558 रुपयांचा आहे. या प्लॅनची वैधता 56 दिवसांची आहे. अशा परिस्थितीत वापरकर्त्यांना या प्लॅनवर दररोज 9.96 रुपये खर्च करावा लागतो. प्लॅनमध्ये एकूण 168 जीबी डेटा उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंगचा लाभ आणि दररोज 100 एसएमएस पाठविण्याची सुविधा उपलब्ध आहे. प्लॅनमध्ये यूजर्सला 449 रुपये किमतीचं व्होडाफोन प्ले आणि 999 रुपयांचं ZEE5चं सब्सक्रिप्शन मिळेल.
दररोज 3 जीबी डेटा देणारा व्होडाफोनचा हा दुसरा प्लॅन 398 रुपयांचा आहे. या प्लॅनची वैधता 28 दिवसांची आहे. प्लॅनमधील प्रत्येक दिवसाला 14.21 रुपये खर्च येतो. प्लॅनमध्ये एकूण 84 जीबी डेटा उपलब्ध आहे. या व्यतिरिक्त व्होडाफोनच्या या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंगचा फायदा आहे. तसेच दररोज 100 एसएमएस पाठविण्याची सुविधा आहे. प्लॅनमध्ये यूजर्सला 449 रुपये किमतीचं व्होडाफोन प्ले आणि 999 रुपयांचं ZEE5चं सब्सक्रिप्शन मिळेल.

जिओच्या 3 जीबी डेटा देण्याच्या प्लॅनवर दररोज 11.89 रुपये खर्च
रिलायन्स जिओकडे दररोज 3 जीबी डेटा देणारे 3 प्लॅन आहेत. पहिला प्लॅन 999 रुपयांचा आहे. या प्लॅनची वैधता 84 दिवसांची आहे. प्लॅनमध्ये प्रत्येक दिवसाला 11.89 रुपये मोजावे लागतात. या रिचार्ज प्लॅनमध्ये एकूण 252 जीबी डेटा उपलब्ध आहे. योजनेत Jio-to-Jio कॉलिंग विनामूल्य आहे. त्याच वेळी दुसऱ्या नेटवर्कच्या क्रमांकावर कॉल करण्यासाठी आपल्याला एकूण 3,000 मिनिटे मोफत मिळतात. याशिवाय दररोज 100 एसएमएस पाठविण्याची सुविधा आहे. तसेच जिओ अॅप्सची सदस्यता मिळते.

दिवसाला 14.32 रुपये योजनेवर खर्च करा
जिओचा दुसरा प्लॅन 401 रुपयांचा आहे. या प्लॅनची वैधता 28 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये एकूण 90GB डेटा उपलब्ध आहे. प्लॅनमध्ये प्रत्येक दिवसाला 14.32 रुपये खर्च येतो. Jio-to-Jio कॉलिंग सुविधा विनामूल्य आहे. त्याच वेळी, आपल्याला दुसर्‍या नेटवर्कच्या नंबरवर कॉल करण्यासाठी 1000 मिनिटे मोफत मिळतील. दररोज 100 एसएमएस पाठविण्याची सुविधा आहे. या व्यतिरिक्त जिओच्या प्लॅनमध्ये 399 रुपयांचं Disney+ Hotstarची १ वर्षाची सदस्यता विनामूल्य उपलब्ध आहे. तसेच जिओ अॅप्सची सदस्यातही मिळते.

दररोज 3 जीबी डेटा देणारा रिलायन्स जिओचा प्लॅन 349 रुपयांचा आहे. या प्लॅनची वैधता 28 दिवसांची आहे. प्लॅनमधील प्रत्येक दिवसाची किंमत 12.46 रुपये खर्च आहे. प्लॅनमध्ये एकूण 84 जीबी डेटा उपलब्ध आहे. योजनेत Jio-to-Jio कॉलिंग पूर्णपणे विनामूल्य आहे. त्याच वेळी, दुसर्‍या नेटवर्कच्या क्रमांकावर कॉल करण्याच्या योजनेत 1,000 मोफत  मिनिटे उपलब्ध आहेत. या प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएस पाठविण्याची सोय आहे. तसेच जिओ अॅप्सची सदस्यता मिळते.

हेही वाचा

"सत्तेसाठी मोदी ताकदवान नेता असल्याची खोटी प्रतिमा पसरवली; आता तीच ठरतेय भारताची दुर्बलता"

भारतीय लष्कराची तयारी पाहून चीन बिथरला; तिबेटमध्ये बनवलं थेट 'उडतं हॉस्पिटल'

सोन्याचे भाव पुन्हा एकदा झाले कमी, असे आहेत आजचे दर

सोन्याची वायदा बाजारातील किंमत कमी झाली; जाणून घ्या...

ग्रामीण बँकांमध्ये 9638 पदांसाठी नोकऱ्यांची खैरात! उद्या संपणार मुदत, असा करा अर्ज

सरकारच्या 'या' योजनेत पाच वर्षांसाठी १ लाख गुंतवल्यावर मिळतोय मोठा लाभ, पैसेही राहणार सुरक्षित

Web Title: cheapest recharge plan offering daily 3gb data

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.