पाकिस्तानचा चीनला दे धक्का; बिगो अ‍ॅप बॅन, आता टिकटॉकवर टांगती तलवार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2020 01:19 PM2020-07-21T13:19:40+5:302020-07-21T13:21:27+5:30

पाकिस्तान सरकारने दिलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की, टिकटॉक आणि बिगोविषयी समाजातील विविध घटकांकडून तक्रारी आल्या आहेत.

pakistan gives big blow to china bigo app ban tiktok final warning | पाकिस्तानचा चीनला दे धक्का; बिगो अ‍ॅप बॅन, आता टिकटॉकवर टांगती तलवार

पाकिस्तानचा चीनला दे धक्का; बिगो अ‍ॅप बॅन, आता टिकटॉकवर टांगती तलवार

Next

पाकिस्तानच्या इम्रान खान सरकारने आपल्या ‘सदाबहार मित्र’ असलेल्या चीनला मोठा धक्का दिला आहे. भारतानंतर आता पाकिस्ताननेचीनच्या बिगो अ‍ॅपवरही बंदी घातली असून, टिकटॉकलाही अंतिम इशारा दिला आहे. पाकिस्ताननं अश्लील व्हिडीओ आणि अनैतिक फोटो दाखवल्याप्रकरणी ही बंदी घातली आहे. यापूर्वी पाकिस्तानने पबजी या गेमिंग अ‍ॅपवरही बंदी घातली होती. गेल्या आठवड्यातच लाहोर उच्च न्यायालयात टिकटॉकवर त्वरित बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. हे अ‍ॅप आधुनिक काळात मोठं दुष्कर्म पसरवत असल्याचे याचिकाकर्त्याने म्हटले होते. ते म्हणाले की, सोशल मीडियावर प्रसिद्धी आणि रेटिंगच्या मोहात  टिकटॉक अश्लीलतेचे प्रमुख स्त्रोत बनले आहे. पाकिस्तान सरकारने दिलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की, टिकटॉक आणि बिगोविषयी समाजातील विविध घटकांकडून तक्रारी आल्या आहेत.

या दोन्ही अ‍ॅप्सकडून समाधानकारक उत्तर मिळालेलं नाही, असे पाकिस्तान सरकारने म्हटले आहे. यानंतर सरकारने बिगो ऍपवर बंदी घातली आणि टिकटॉकला अंतिम इशारा दिला आहे. यापूर्वी इम्रान खान सरकारने ऑनलाइन मल्टिप्लेअर गेम पबजीवर बंदी आणण्याची घोषणा केली होती. हा खेळ इस्लामविरोधी असून, या खेळानं तरुणांना व्यसन लागल्याचे सरकारने म्हटले होते.

या खेळामुळे तरुणांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होत असल्याचेही सरकारने म्हटले आहे. पाकिस्तान दूरसंचार प्राधिकरणाच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानमधील पबजी खेळणाऱ्या तरुणांना बर्‍याच मानसिक दबावाला सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत तरुणांमध्ये आत्महत्या करण्याच्या घटनांमध्येही झपाट्याने वाढ झाली आहे. या सरकारी एजन्सीने इस्लामाबाद उच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान सांगितले की, पबजी गेममधील काही दृश्ये इस्लामविरोधी आहेत. ज्यांना पाकिस्तानमध्ये परवानगी नाही.

हेही वाचा

माइन्समध्ये लपलेल्या शत्रूलाही शोधून करणार ठार, 'या' तंत्रज्ञानानं भारताचे टी-90 टँक सुसज्ज

चाबहार रेल्वे प्रकल्पातून भारताला वगळलं ही तर अफवा; इराणनं केलं स्पष्ट

देशात राहणार आता फक्त ५ सरकारी बँका; मोदी सरकार भागीदारी विकणार

आनंदवार्ता! परीक्षेशिवाय मिळणार नोकरी; कोर्टात निघाली भरती

दररोज 3GB डेटा देणारे तीन कंपन्यांचे सर्वात स्वस्त प्लॅन; जाणून घ्या सर्वकाही

"सत्तेसाठी मोदी ताकदवान नेता असल्याची खोटी प्रतिमा पसरवली; आता तीच ठरतेय भारताची दुर्बलता"

भारतीय लष्कराची तयारी पाहून चीन बिथरला; तिबेटमध्ये बनवलं थेट 'उडतं हॉस्पिटल'

सरकारच्या 'या' योजनेत पाच वर्षांसाठी १ लाख गुंतवल्यावर मिळतोय मोठा लाभ, पैसेही राहणार सुरक्षित

Web Title: pakistan gives big blow to china bigo app ban tiktok final warning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.