... त्यामुळे राहुल गांधींना पाहताच भाजप खासदारांचे 'दो कदम पिछे'
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2018 09:18 IST2018-07-26T08:17:06+5:302018-07-26T09:18:36+5:30
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी भाजप खासदारांना माझी भीती वाटत असल्याचे म्हटले आहे. भाजप खासदार मला पाहून दोन पाऊलं मागे सरकतात. कारण,

... त्यामुळे राहुल गांधींना पाहताच भाजप खासदारांचे 'दो कदम पिछे'
मुंबई - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी भाजप खासदारांना माझी भीती वाटत असल्याचे म्हटले आहे. भाजप खासदार मला पाहून दोन पाऊलं मागे सरकतात. कदाचित मी त्यांनाही गळाभेट देतो की काय, अशीच भीती भाजप खासदारांना वाटत असल्याचे राहुल यांनी बुधवारी म्हटले. लोकसभेत अविश्वास प्रस्तावादरम्यानच्या भाषणावेळी राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना चक्क संसदेतच गळाभेट दिली होती.
संसदेतील भाषणादरम्यान राहुल गांधींनी मोदींना मारलेली मिठी देशात चर्चेचा विषय ठरली. या गळाभेटीनंतर देशभर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. तर काँग्रेस नेत्यांनी या गळाभेटीचे समर्थन करताना काँग्रेस हा प्रेमाचा वर्षाव करणारा पक्ष असल्याचे म्हटले. तर भाजप नेत्यांनी या गळाभेटीवरुन राहुल यांना टार्गेट केले आहे. दिल्लीतील एका पुस्तक प्रकाशनावेळी राहुल गांधी म्हणाले, तुम्ही तुमच्या पूर्ण ताकदिनिशी एखाद्याचा विरोध करु शकता, पण तुम्ही त्यांचा द्वेष करत असला तर ते तुमचे वैयक्तीक मत आहे. मी अडवाणींशी असहमत असू शकतो, देशाप्रती त्यांच्या आणि माझ्या विचारांमध्ये कमालीचा विरोधही राहिल. त्यांच्या विचारांचा मी पूर्णपणे विरोध करेल. पण, त्यामुळे मी त्यांचा द्वेष करणे हे चुकीचे आहे. दरम्यान, या कार्यक्रमावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी हेही हजर होते.