शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

मोदी जेव्हा टीका करतात, तेव्हा त्यांना मिठी मारावीशी वाटते- राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2019 13:59 IST

राहुल गांधींचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला

ओदिशा: भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं केलेली टीका माझ्यासाठी गिफ्ट आहे. यापेक्षा दुसरं मोठं गिफ्ट माझ्यासाठी असू शकत नाही. जेव्हा जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी माझ्यावर टीका करतात, तेव्हा तेव्हा त्यांना मिठी मारावीशी वाटते, असं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी आज ओदिशाच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी एका कार्यक्रमात बोलताना राहुल यांनी पंतप्रधान मोदींवर उपरोधिक टीका केली. 'भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं माझ्यावर अनेकदा टीका केली. एक राजकारणी म्हणून, एक माणूस म्हणून माझ्यासाठी ही टीका महत्त्वाची आहे. त्यांची टीका, शिव्याशाप यापेक्षा दुसरं चांगलं गिफ्ट माझ्यासाठी असू शकत नाही. मोदी जेव्हा जेव्हा माझ्यावर टीका करतात, तेव्हा तेव्हा त्यांना जाऊन मिठी मारावी, असा विचार माझ्या मनात येतो,' अशा शब्दांमध्ये राहुल यांनी जोरदार टोलेबाजी केली. 'ते (पंतप्रधान मोदी) माझ्याशी सहमत नाहीत याची मला कल्पना आहे. मीदेखील त्यांच्याशी सहमत नाही. मी त्यांच्याशी दोन हात करेन. ते पुन्हा पंतप्रधान होऊ नयेत, यासाठी मी प्रयत्न करेन. पण मी कधीच त्यांचा तिरस्कार करणार नाही. त्यांना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार आहे,' असं राहुल गांधी म्हणाले.पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मन की बात आणि जनसभांवरही राहुल यांनी मिश्किल भाषेत टीका केली. 'आम्ही लोकांचं ऐकतो. मलाच सर्व माहीत आहे, असं मोदींना वाटतं. आम्हाला मात्र तसं वाटत नाही. मोदींच्या भाषणावरील आपलं मत लोकांना व्यक्तच करता येत नाही. हाच भाजपा आणि काँग्रेसमधला सर्वात मोठा फरक आहे,' असं राहुल म्हणाले. आपल्याला चीनला टक्कर द्यायची असल्यास रोजगाराच्या संधी वेगानं निर्माण कराव्या लागतील, असंही त्यांनी पुढे म्हटलं. स्वयंचलित यंत्रांचा परिणाम चीनमधील रोजगारांवर का होत नाही?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 'जेव्हा मी कैलास मानसरोवर यात्रेला गेलो होतो, त्यावेळी मी तिथल्या काही मंत्र्यांशी चर्चा केली. रोजगार निर्मिती ही आमच्यासाठी समस्या नाही, असं ते म्हणाले. जेव्हा तुम्ही तंत्रज्ञानाचा वापर करुन मोठ्या प्रमाणावर उत्पादन निर्मिती करता, तेव्हा तुमच्या समोरील अडचणी कमी होतात,' असं राहुल गांधी म्हणाले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ