शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
3
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
4
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
5
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
6
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
7
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
8
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
9
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
10
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
11
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
12
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
13
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
14
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
15
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
16
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
17
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
18
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
19
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
20
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे

Video: राहुल गांधींचा राजीनामा एकमताने फेटाळला; काँग्रेसची मॅरेथॉन बैठक संपली 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2019 4:30 PM

काँग्रेसमध्ये अंतर्गत बदल करण्याचे सर्वाधिकार राहुल गांधींना देण्यात आले आहेत

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर दिल्लीत आज काँग्रेस कार्यकारणीची बैठक झाली. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बैठकीत अध्यक्षपदाच्या राजीनाम्याचा प्रस्ताव ठेवला. मात्र कार्यकारणी समितीने राहुल यांनी राजीनामा देऊ नये असा सल्ला दिला. जवळपास  साडेतीन तास चाललेल्या या बैठकीत पराभवावर चिंतन करण्यात आलं. या बैठकीत राहुल गांधी यांचा राजीनामा कार्यकारणी समितीच्या सदस्यांनी एकमताने फेटाळला असल्याची माहिती काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिली.  

बैठकीबाबत पत्रकार परिषदेत रणदीप सुरजेवाला म्हणाले की, काँग्रेसच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत राहुल गांधी यांनी मी राजीनामा देत असल्याचं सांगितलं. मात्र हा राजीनामा एकमताने फेटाळून लावला. तसेच काँग्रेसमध्ये अंतर्गत बदल करण्याचे सर्वाधिकार राहुल गांधींना देण्यात आले आहेत असं त्यांनी सांगितले. 

दिल्ली येथे झालेल्या काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी राजीनामा दिला आणि समितीने राहुल यांनी राजीनामा देऊ नका असा सल्ला दिला. दोन दिवसांआधीच राहुल गांधी राजीनामा देणार होते मात्र यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी त्यांना रोखलं. कार्यकारणीच्या बैठकीआधी राहुल गांधी राजीनामा देण्यासाठी आग्रही होते तर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी आणि महासचिव के सी वेणुगोपाळ यांनी त्यांना राजीनामा देऊ नका असा सल्ला दिला. 

कार्यकारणीच्या बैठकीआधी राहुल गांधी काँग्रेस मुख्यालयात पोहचले तेव्हा माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी त्यांची भेट घेतली. त्यावेळी मनमोहन सिंग यांनीही राहुल यांना राजीनामा देऊ नका असं सांगितले. तसेच तुम्ही अध्यक्ष नसाल तर कोण अध्यक्ष होणार? असा सवाल करत मनमोहन यांनी निवडणुकीत जय-पराजय होत असतो त्यासाठी राजीनामा देण्याची गरज नाही असं सांगितले. त्यानंतरही राहुल गांधी यांनी कार्यकारणीच्या बैठकीत राजीनामा सादर केला. त्यावर कार्यकारणी समितीच्या सदस्यांनी मागील 5 वर्षात राहुल गांधी यांनीच नरेंद्र मोदी यांना आव्हान दिलं आहे असं सांगितले.  

तसेच लोकसभा निवडणुकीच्या पराभवावर सखोल चर्चा केली जाईल. आम्हाला अपेक्षित यश मिळालं नाही त्यावर आगामी बैठकीत चर्चा होईल अशी माहिती काँग्रेस नेते ए. के अँन्टनी यांनी दिली. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी