शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी यांनी एक वर्षात तीन राज्यांतून भाजपाला हटविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2018 06:44 IST

संपूर्ण भाजपा ज्यांना पप्पू म्हणून संबोधतो त्या राहुल गांधी यांच्या कठोर मेहनतीमुळे काँग्रेसने हिंदी भाषक राज्यांत ‘अजेय’चा दावा करणाऱ्या भाजपाचे सिंहासन हलवून सोडले.

- शीलेश शर्मा नवी दिल्ली : संपूर्ण भाजपा ज्यांना पप्पू म्हणून संबोधतो त्या राहुल गांधी यांच्या कठोर मेहनतीमुळे काँग्रेसने हिंदी भाषक राज्यांत ‘अजेय’चा दावा करणाऱ्या भाजपाचे सिंहासन हलवून सोडले. ३ राज्यांतील विजय काँग्रेससाठी महत्त्वाचा आहे. कारण, ११ डिसेंबर २०१७ रोजी राहुल गांधी यांनी अध्यक्षपद स्वीकारले होते. बरोब्बर एका वर्षांनंतर ११ डिसेंबर २०१८ रोजी ३ राज्यांतून भाजपाला बाहेर करीत, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेस चांगले यश मिळवू शकते, हे सिद्ध केले.मतमोजणी सुरू झाल्यानंतर आणि विजयाचे संकेत मिळाल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी दहा जनपथवर पोहोचले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी सोनिया गांधी यांच्याशी जवळपास ४० मिनिटे चर्चा केली. यावेळी त्यांनी निश्चित केले की, कोणत्या राज्याची सूत्रे कोणत्या नेत्याकडे सोपवावी. २०१९ च्या लोकसभा निवडणुका पाहता, निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण केली जावीत. प्रादेशिक पक्षांबाबत राहुल गांधी हे गंभीर आहेत. त्यामुळेच राजस्थान, मध्यप्रदेशात बसपा आणि सपाला सोबत घेतले जाऊ शकते.मिझोराम आणि तेलंगणात यश न मिळाल्याची खंत काँग्रेसमध्ये नाही. तेलंगणात तेलुगू देसम पार्टीच्या विरोधात वातावरण आहे हे माहीत असूनही काँग्रेसने त्यांच्याशी आघाडी केली. कारण, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी चंद्राबाबू यांची महत्त्वाची भूमिका राहू शकते, हे जाणून हा निर्णय घेतला. मध्यप्रदेशातील निकालाचा कल येताच राहुल गांधी हे थेट अखिलेश यादव आणि बसपा प्रमुख मायावती यांच्या संपर्कात आहेत. जेणेकरून गरज पडल्यास त्यांची मदत घेतली जाऊ शकेल.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीChhattisgarhछत्तीसगडMadhya Pradeshमध्य प्रदेशRajasthanराजस्थान