शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

"नेहरूंची ओळख ही त्यांचे कर्म आहे, नाव नाही", राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2023 12:32 IST

स्वातंत्र्य दिनानिमित्त नवी दिल्लीतील तीन मूर्ती संकुलातील नेहरू मेमोरियल म्युझियमचे पीएम म्युझियम अँड लायब्ररी (PMML) असे नामकरण करण्यात आले.

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नेहरू मेमोरियल म्युझियमच्या नामांतरावर प्रतिक्रिया दिली आहे. नेहरूंची ओळख ही त्यांचे कर्म आहे, त्यांचे नाव नाही, असे म्हणत राहुल गांधी यांनी अप्रत्यक्षरित्या मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. लडाख दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी राहुल गांधी यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. 

स्वातंत्र्य दिनानिमित्त नवी दिल्लीतील तीन मूर्ती संकुलातील नेहरू मेमोरियल म्युझियमचे पीएम म्युझियम अँड लायब्ररी (PMML) असे नामकरण करण्यात आले. १५ जून २०२३ रोजी राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या संदर्भात निर्णय घेण्यात आला होता, ज्याची औपचारिकता स्वातंत्र्य दिनाच्या (१४ ऑगस्ट) पूर्वसंध्येला झाली. 

राहुल गांधी दोन दिवसांच्या लडाख दौऱ्यावर रवाना झाले आहेत. दुपारी एक वाजता ते लेहला पोहोचतील. केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतर राहुल गांधी लडाखच्या दौऱ्यात पहिल्यांदाच लेह आणि कारगिलला भेट देणार आहेत. यादरम्यान ते काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांची भेट घेणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजकीय कार्यक्रमांव्यतिरिक्त राहुल गांधी लडाखमध्ये बाईक ट्रिपही करणार आहेत. 

दरम्यान, राहुल गांधी यांच्या अनुपस्थितीमुळे लोकसभा निवडणुकीच्या तयारीसंदर्भात आज होणारी बिहार प्रदेश काँग्रेसची बैठक पुढे ढकलण्यात आल्याचे समजते. याचबरोबर, पुढील महिन्यात हिल कौन्सिलच्या निवडणुका होणार आहेत. त्या दौऱ्यात राहुल गांधी कारगिललाही भेट देणार आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. कारगिल हिल कौन्सिलच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने नॅशनल कॉन्फरन्ससोबत युती केली आहे.

नामांतराचा निर्णय का घेतला गेला?भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे स्वातंत्र्यानंतर अधिकृत निवासस्थान किशोर मूर्ती भवन होते. पंडित नेहरूंच्या निधनानंतर पुढे या संकुलाचे नेहरू मेमोरियल म्युझियम आणि लायब्ररीत रूपांतर करण्यात आले. २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक कल्पना मांडली की तीन मूर्ती संकुलात भारताच्या सर्व पंतप्रधानांना समर्पित एक संग्रहालय असावे, ज्याला नेहरू स्मारकाच्या कार्यकारी परिषदेने मान्यता दिली. २०२२ मध्ये, पंतप्रधानांना समर्पित हे संग्रहालय पूर्ण झाले. त्यानंतर ते एप्रिल २०२२ मध्ये लोकांसाठी खुले करण्यात आले. जून महिन्यात झालेल्या बैठकीत नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. नृपेंद्र मिश्रा,जे पीएम मोदींचे मुख्य सचिव होते, ते पीएम संग्रहालयाच्या कार्यकारी परिषदेचे अध्यक्ष आहेत.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीdelhiदिल्ली