शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींच्या EVM फिक्सिंगच्या आरोपांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2024 16:59 IST

राहुल गांधी यांनी पीएम मोदींवर लोकसभा निवडणुकीत मॅच फिक्सिंगसारखे आरोप केले होते.

Rahul Gandhi on EVM: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर INDIA आघाडीने रविवारी (31 मार्च) दिल्लीतील ऐतिहासिक रामलीला मैदानावर 'लोकशाही वाचवा' सभेचे आयोजन केले होते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या सभेतून भाजपवर मॅच फिक्सिंग आणि EVM हॅकिंगसारखे आरोप केले. आता राहुल गांधींच्या याच वक्तव्याविरोधात भाजपने निवडणूक आयोगात तक्रार दाखल केली आहे.

काय म्हणाले होते राहुल गांधी?राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर लोकसभा निवडणुकीत मॅच फिक्सिंग केल्याचा आरोप केला होता. तसेच, भाजप त्यांच्या प्रयत्नांमध्ये यशस्वी झाला, तर देशाची घटना बदलली जाईल आणि लोकांचे अधिकार नष्ट होतील. ही मॅच फिक्सिंग थांबवण्यासाठी संपूर्ण ताकदीने मतदान करण्याचे आवाहनदेखील राहुल यांनी केले होते. मॅच फिक्सिंगशिवाय, ईव्हीएम (हॅकिंग) शिवाय, सोशल मीडिया आणि प्रेसवर दबाव आणल्याशिवाय ते 180 चा टप्पाही पार करू शकणार नाहीत, असा आरोपही त्यांनी केला होता.

भाजपचे प्रत्युत्तर राहुल यांच्या आरोपावर पलटवार करताना भाजपचे प्रवक्ते शेहजाद पूनावाला म्हणावे की, पूर्वीच्या काँग्रेस सरकारने त्यांच्या प्रमुख कुटुंबाला फायदा मिळवून देण्यासाठी श्रीलंकेशी करार केला आणि आपले  कच्चातीवू बेट त्यांना देऊन टाकले. फूट पाडणारे राजकारण काँग्रेसच्या 'डीएनए'मध्ये आहे. 1947 मध्ये धर्माच्या आधारावर देशाचे विभाजन करून जम्मू-काश्मीरचा काही भाग पाकिस्तानच्या ताब्यात देण्यास काँग्रेसने मागेपुढे पाहिले नाही, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

भ्रष्टाचारात बुडालेल्या लोकांची सभा- भाजपदरम्यान, भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनीदेखील इंडिया आघाडीच्या लोकशाही वाचवा सेभवर जोरदार टीका केली होती. सभा घ्यायला बंदी नाही, पण जमवणारे कोण? जे भ्रष्टाचारात बुडाले आहेत ते...जे जनतेचा पैसा लुटून तुरुंगात गेले आहेत ते...केजरीवाल लालूंच्या पावलावर पाऊल टाकत आहेत. असे भ्रष्टाचारी लोक पीएम मोदींच्या प्रामाणिक सरकारविरोधात एकवटले आहेत. पण, या देशातील जनता त्यांचे ऐकणार नाही. 4 जूनला सर्व काही स्पष्ट होईल.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४