शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
3
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
4
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
5
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
6
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
7
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
8
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
9
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
10
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
11
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
12
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
13
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
14
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
15
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

राहुल गांधी निपाह व्हायरससारखे; हरियाणाचे मंत्री बरळले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2018 8:28 AM

विरोधकांच्या एकजुटीवरही भाजपा नेत्याचं शरसंधान

नवी दिल्ली: राहुल गांधी हे निपाह व्हायरससारखे आहेत. जो पक्ष त्यांच्या संपर्कात येईल, तो संपून जाईल, असं वादग्रस्त विधान हरियाणाचे मंत्री अनिल विज यांनी केलंय. विज हे आधीही त्यांच्या विधानांमुळे चर्चेत राहिलेत. कर्नाटकमध्ये एच. डी. कुमारस्वामी यांच्या शपथविधीवेळी काँग्रेससह अनेक विरोधी पक्ष एकत्र आले होते. यावर भाष्य करताना अनिल विज यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची तुलना थेट निपाह व्हायरसशी केली. 'ते (विरोधी पक्ष) एकत्र येण्याचा प्रयत्न करताहेत. मात्र राहुल गांधी निपाह व्हायरससारखे असल्यानं, त्यांच्या संपर्कात येणारे पक्ष संपून जातील,' असं विज म्हणाले. केरळमध्ये सध्या निपाह व्हायरसनं थैमान घातलंय. आतापर्यंत या व्हायरसमुळे 14 जणांना जीव गमवावा लागलाय. निपाह व्हायरसवर अद्याप कोणतीही लस सापडलेली नाही. त्यामुळेच हा व्हायरस जीवघेणा ठरतोय. हाच संदर्भ देऊन भाजपा नेते अनिल विज यांनी राहुल गांधींवर टीका केलीय. विज यांनी याआधीही अनेकदा राहुल गांधींवर शरसंधान साधलंय. डिसेंबरमध्ये राहुल गांधींनी सोनिया गांधींकडून पक्षाच्या नेतृत्त्वाची धुरा स्वीकारली. त्यावेळीही विज यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला होता. 'पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काँग्रेसमुक्त भारत अभियानाला राहुल गांधी हातभार लावतील,' असा टोला त्यावेळी विज यांनी लगावला होता. गेल्या वर्षी विज यांनी महात्मा गांधी यांच्यावर केलेल्या विधानामुळे भाजपावर चोहोबाजूंनी टीकेची झोड उठली होती. नोटांवर महात्मा गांधींचा फोटो असल्यानं भारतीय चलनाचं मूल्य घसरत असल्याचं विधान त्यांनी केलं होतं. खादीच्या प्रचार आणि प्रचारासाठी महात्मा गांधींपेक्षा मोदीच सरस आहेत, असंही वादग्रस्त विधान विज यांनी केलं होतं. भाजपानं विज यांच्या विधानांवरुन हात झटकले होते. विज यांची विधानं हे त्यांचं वैयक्तिक मत असल्याचं स्पष्टीकरण भाजपाकडून देण्यात आलं होतं.   

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेसAnil Vijअनिल विजPoliticsराजकारण