सेम टू सेम...! 'भारत जोडो' यात्रेत राहुल गांधींच्या ड्युप्लिकेटची हवा, व्हायरल Video; पाहा... 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2023 09:48 PM2023-01-05T21:48:23+5:302023-01-05T21:49:25+5:30

राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो' यात्रेनं सध्या उत्तर प्रदेशमधून हरियाणात प्रवेश केला आहे.

rahul gandhi look alike faisal chaudhary bharat jodo yatra baghpat up | सेम टू सेम...! 'भारत जोडो' यात्रेत राहुल गांधींच्या ड्युप्लिकेटची हवा, व्हायरल Video; पाहा... 

सेम टू सेम...! 'भारत जोडो' यात्रेत राहुल गांधींच्या ड्युप्लिकेटची हवा, व्हायरल Video; पाहा... 

Next

नवी दिल्ली-

राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो' यात्रेनं सध्या उत्तर प्रदेशमधून हरियाणात प्रवेश केला आहे. यूपीमध्ये यात्रा जेव्हा बागपतच्या रस्त्यावरुन मेरठच्या दिशेनं जात होती तेव्हा राहुल गांधींसारखा हुबेहुब दिसणारा व्यक्ती यात्रेत सामील झाला आणि त्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. फैसल चौधरी नावाचा तरुण अगदी 'सेम टू सेम' राहुल गांधींसारखा दिसतो. त्यानं राहुल यांच्यासारखंच पांढऱ्या रंगाचं टी-शर्ट घातलं होतं. तसंच दाढीही वाढवली आहे. 

फैसल चौधरी मेरठचा रहिवासी असून तो काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता असल्याचीही माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षभरापासून मला लोक सांगत आहेत की तू राहुल गांधींसारखा दिसतोस. अनेक लोक भेटतात आणि राहुल गांधी समजून माझ्यासोबत फोटोही काढतात, व्हिडिओही घेतात, असं फैसलनं सांगितलं.

"राहुल गांधींसारखे आपण दिसतो हे ऐकून चांगलं वाटतं. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मीही काँग्रेसचाच कार्यकर्ता आहे. भारत जोडो यात्रेतून नक्कीच एक चांगला संदेश समाजात जाईल. यात बेरोजगारी, शेतकऱ्यांचाही मुद्दा उपस्थित केला जात आहे जी खरंच खूप चांगली बाब आहे. मी ४ जानेवारीपासून यात्रेत सहभागी झालो आहे", असं फैसल म्हणाला. 

राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ७ सप्टेंबर २०२२ रोजी काँग्रेसची 'भारत जोडो' यात्रा सुरू झाली. ही यात्रा १२ राज्यांमधून थेट जम्मू-काश्मीरपर्यंत जाणार आहे. राहुल गांधी आतापर्यंत ३ हजाराहून अधिकचं अंतर पायी चालले आहेत. आता फक्त ३४२ किमीचा प्रवास बाकी राहिला आहे. हरियाणानंतर पंजाब आणि जम्मू-काश्मीरला पोहोचणार आहे. 

राहुल गांधी यांनी आज बागपतमध्ये आयोजित जाहीर सभेत केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. "मी टी-शर्ट घालतो तर त्यावर बोललं जातं. पण शेतकरी इतक्या थंडीत काम करतो त्याबद्दल कुणी बोलत नाही. भाजपाची पॉलिसी देशातील युवांना, शेतकऱ्यांना, कामगारांना घाबरवण्याची पॉलिसी आहे. कारण त्यांना माहित आहे जेव्हा भीती पसरवली जाते तेव्हा त्याचं रुपांतर द्वेषात करायला वेळ लागत नाही. हेच यांचं काम आहे", असं राहुल गांधी म्हणाले.

Web Title: rahul gandhi look alike faisal chaudhary bharat jodo yatra baghpat up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.