शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
2
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
3
युक्रेनचा रशियावर मोठा ड्रोन हल्ला! १९३ ड्रोनमधून गोळीबार, मॉस्कोतील दोन विमानतळ बंद
4
'वॉशिंग्टन पोस्ट'चा अहवाल LIC ने फेटाळला; अदानी समूहात फक्त ४% गुंतवणूक, मग सर्वाधिक पैसा कुठे?
5
Video: घरात अन् महाराष्ट्रात जिथं असाल तिथे मराठीत बोला, नाहीतर...; अजित पवारांचं आवाहन
6
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
7
८ वर्षाचं नातं क्षणातच विसरली, पत्नीनं केलेल्या कांडामुळे पती झाला शॉक; चिठ्ठी लिहिली अन्...
8
MCX वर आपटले होते, पण सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढले, खरेदी करणार असाल तर पाहा लेटेस्ट रेट
9
Mumbai Crime: "शेवटचे दिवस जवळ आलेत", भावेश शिंदे घरातून बाहेर पडला आणि मुंबई लोकलखाली संपवले आयुष्य
10
Desi Jugaad: तरुणांची चपाती फुगवण्याची सीक्रेट ट्रिक व्हायरल; व्हिडीओ पाहून महिलांची उडेल झोप!
11
निष्काळजीपणाचा कळस! रुग्णालयात महिलेला लावलं एक्सपायर्ड ग्लुकोज, तोंडातून फेस आला अन्...
12
बिहार निवडणुकीच्या रणधुमाळीतच भाजपची मोठी कारवाई, चार नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; करण्यात आले गंभीर आरोप
13
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
14
“महायुतीचे शेतकरी पॅकेज थोतांड, कर्जमाफी करावी; राज्य दिवाळखोरीत काढले”: हर्षवर्धन सपकाळ
15
EPF खातेधारकांना मोठी भेट! 'फ्री'मध्ये मिळतोय ₹७ लाखांपर्यंतचा जीवन विमा; कुटुंबाला मिळेल मोठा आधार
16
२० वर्षीय भारतीय तरुणीवर ब्रिटनमध्ये बलात्कार, आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद; वर्णद्वेषातून कृत्य
17
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा
18
मर्डर मिस्ट्री! क्राइम सीरीज पाहून तरुणीने घेतला लिव्ह इन पार्टनरचा जीव, 'असं' उलगडलं गूढ
19
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?

"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2024 22:05 IST

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी राहुल गांधींवर जोरदार टीका केली.

Himanta Biswa Sarma on Rahul Gandhi : भाजपचे फायरब्रँड नेते आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) अनेकदा काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर अतिशय टोकाची टीका करत असतात. आता पुन्हा एकदा त्यांनी राहुल यांच्यावर बोचरी टीका केली आहे. सोमवारी(30 सप्टेंबर) झारखंडची राजधानी रांची येथे जाहीर सभेला संबोधित करताना सीएम सरमा यांनी राहुल गांधींना कार्टून पाहण्याचा सल्ला दिला.

हिमंता म्हणाले की, "राहुल गांधी हे निष्पाप बालकासारखे आहेत. त्यांनी लहानपणी कॉमिक्स वाचली असतील, म्हणूनच ते स्वतःला फॅन्टम समजतात. मला कात्री आहे की, ते अजूनही घरात बसून कार्टून पाहतात," असी बोचरी टीका त्यांनी केली. 

'भारतातही नसरल्लाह आहेत...'दरम्यान, इस्त्रायली हल्ल्यात हिजबुल्ला प्रमुख हसन नसरल्लाहच्या मृत्यूनंतर जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या निदर्शनांबाबत हिमंता यांनी पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांना उद्देशून म्हटले की, "नसराल्लाहचा मृत्यू झाला, म्हणून हे लोक रडत आहेत. आता भारतातही काही नसरल्ला आहे, त्यांनाही शोधून मारावे लागेल." 

झारखंडमध्ये जागावाटप जवळपास अंतिम झारखंड विधानसभा निवडणुकीतील जागावाटपाच्या मुद्द्यावर सीएम सरमा म्हणाले की, "आमचे जागावाटप जवळपास निश्चित झाले आहे. आम्ही JDU आणि AJSU सोबत निवडणूक लढवणार आहोत. आम्हाला JDU आणि AJSU साठी काही जागा सोडाव्या लागतील. यासाठी संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. 2-3 बैठकाही झाल्या असून, 3-4 ऑक्टोबरपर्यंत आम्ही जागांबाबत अधिकृत घोषणादेखील करू."

नसरल्लाहच्या मृत्यूवर मेहबुबा यांना शोकइस्रायलने लेबनॉनमधील हिजबुल्लाच्या ठिकाणांवरील हल्ले तीव्र केले आहेत. नुकताच इस्रायलच्या हवाई दलाने केलेल्या हल्ल्यात हिजबुल्ला प्रमुख नसराल्लाहसह अनेक कमांडर मारले गेले. यानंतर पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी हिजबुल्लाचा नेता नसरल्लाह याचे वर्णन शहीद असे केले. तसेच निषेधार्थ आपल्या प्रचाराचा कार्यक्रमही रद्द केला. नसरल्लाह याच्या निधनावर शोक व्यक्त करताना पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी म्हटले की, “मी लेबनॉन आणि गाझामधील शहीदांच्या, विशेषत: हसन नसराल्लाह याच्या समर्थनार्थ रविवारचा निवडणूक दौरा रद्द करत आहे. आम्ही पॅलेस्टाईन आणि लेबनॉनच्या लोकांसोबत उभे आहोत.” 

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीAssamआसामcongressकाँग्रेसBJPभाजपा