शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 18:13 IST

Sam Pitroda News: इंडियन ओव्हरसिज काँग्रेसचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सॅम पित्रोदा यांनी राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्यांवरून केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहे. परदेश दौऱ्यांदरम्यान, राहुल गांधींवर केंद्र सरकारकडून पाळत ठेवली जाते, असा आरोप सॅम पित्रोदा यांनी केला आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्यांवरून देशातील राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चा आणि आरोप प्रत्यारोप होत असतात. दरम्यान, इंडियन ओव्हरसिज काँग्रेसचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सॅम पित्रोदा यांनी राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्यांवरून केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहे. परदेश दौऱ्यांदरम्यान, राहुल गांधींवर केंद्र सरकारकडून पाळत ठेवली जाते, असा आरोप सॅम पित्रोदा यांनी केला आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान, सॅम पित्रोदा यांनी राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्यांवरून भाजपाकडून करण्यात येणारे आरोप फेटाळून लावले. तसेच परदेश दौऱ्यांदरम्यान भारतीय दूतावासामधील लोक राहुल गांधींवर पाळत ठेवून असतात. तसेच अनेक परदेशी नेत्यांना राहुल गांधी यांची भेट घेऊ नका, असे सांगितले जाते, असा आरोप पित्रोदा यांनी केला.

राहुल गांधी यांनी हल्लीच जर्मनीचा दौरा  केला होता. या दौऱ्यावेळी राहुल गांधी यांनी भारतामधील लोकशाहीच्या स्थितीसह अनेक मुद्द्यांवर परखड भाष्य केले होते. दरम्यान, राहुल गांधी यांच्या या दौऱ्याच्या टायमिंगवरून अनेक सवाल उपस्थित करण्यात आले होते. आता सॅम पित्रोदा यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. ते म्हणाले की, आता परदेश दौरे हे अचानक होत नाहीत. तर अनेक महिन्यांपूर्वी त्यांचं नियोजन होतं. जर्मन दौऱ्याचा मुख्य हेतू हा पुरोगामी आघाडीची बैठक हा होता. त्यात सुमारे ११० देशातील पुरोगामी पक्ष सहभागी झाले होते.

यावेळी राहुल गांधींवर परदेशात जाऊन भारत विरोधी वक्तव्ये करत असल्याच्या होणाऱ्या आरोपांबाबत सॅम पित्रोदा यांनी परखड शब्दात प्रत्युत्तर दिले. आजच्या काळात तुम्ही भारतामध्ये जे काही बोलता ते जगभरात पसरतं आणि जे बाहेर बोलता ते देशात पसरतं. खरंतर तुम्हा देशात बोला अगर परदेशात बोला, सत्य हे सत्यच असतं, असा टोलाही पित्रोदा यांनी लगावला.  जर काँग्रेसला संस्थांवर कब्जा होत आहे, प्रसारमाध्यमे पक्षपात करत आहेत, सिव्हिल सोसायटीला कमकुवत केलं जात आहे, असं वाटत असेल तर ही बाब देशातही सांगितली जाईल आणि परदेशातही सांगितली जाईल, असेही पित्रोदा यांनी सांगितले.  

दरम्यान, राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्यादरम्यान, भारतीय दूतावासातील अधिकारी सातत्याने त्यांच्या हालचालींवर पाळत ठेवून असतात. हॉटेलपासून बैठकांपर्यंत तसेच विमानतळांवर लोक आमच्यावर लक्ष ठेवून असतात. एवढंच नाही तर दुतावासामधील लोक फोन करून राहुल गांधी यांना भेटू नका, असे विदेशी नेत्यांना सांगतात, याबाबतचे लेखी पुरावे नाहीत, मात्र हे मी अनुभवाच्या आधारावर सांगू शकतो, असा दावाही सॅम पित्रोदा यांनी केला. 

English
हिंदी सारांश
Web Title : Congress Accuses Government of Spying on Rahul Gandhi During Foreign Trips

Web Summary : Sam Pitroda alleges the government spies on Rahul Gandhi during foreign visits, discouraging foreign leaders from meeting him. He refuted allegations about the timing of Gandhi's visits, emphasizing pre-planning and the importance of open dialogue, whether at home or abroad.
टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसCentral Governmentकेंद्र सरकार