शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

  राहुल गांधींनी धारण केली रुद्राक्षांची माळ?   

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2017 10:53 PM

 गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या कडव्या हिंदुत्वावर मात करण्यासाठी काँग्रेस आणि राहुल गांधींनी सौम्य हिंदुत्वाची कास पकडली होती.दरम्यान राहुल गांधींनी आता चक्क रुद्राक्षाची माळसुद्धा धारण केल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

नवी दिल्ली -  गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या कडव्या हिंदुत्वावर मात करण्यासाठी काँग्रेस आणि राहुल गांधींनी सौम्य हिंदुत्वाची कास पकडली होती.दरम्यान राहुल गांधींनी आता चक्क रुद्राक्षाची माळसुद्धा धारण केल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मंगळवारी गुजरातमधील जगन्नाथ मंदिरात दर्शन घेऊन परतलेल्या राहुल गांधी यांच्या गळ्यात रुद्राक्षांची माळ असल्याचे छायाचित्रांमधून दिसत आहे.  देवदर्शन घेऊन परतल्यावर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान एका छायाचित्रकाराने राहुल गांधी यांच्या गळ्यातील रुद्राक्षांसारखी दिसणारी माळ टिपली आहे. राहुल गांधींच्या गळ्यात प्रथमच अशी माळ दिसत आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे राहुल गांधी यांच्या आजी इंदिरा गांधी या सुद्धा रुद्राक्षांची माळ धारण करणे पसंत करत असत. रुद्राक्षांची माळ ही भगवान शिवशंकराशी संबंधित असल्याचे मानले जाते. त्यामुळे शिवभक्त अशी रुद्राक्ष माळ धारण करतात. दरम्यान काही दिवसांपूर्वीच माझे कुटुंब शिवभक्त असून, आपणही त्याच मार्गाने जात असल्याचे म्हटले होते. इंदिरा गांधी यांची शिवशंकरावर श्रद्धा होती. त्या नेहमी रुद्राक्षांची माळ धारण करत असत. आज जगन्नाथ मंदिरात पूजा केल्यानंतर राहुल गांधी यांना ही रुद्राक्षांची माळ प्रसाद स्वरूपात मिळाली असावी,. अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. गुजरात निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून राहुल गांधी यांनी मंदिरांमध्ये जाऊन देवदर्शनाचा धडाका लावला आहे. आतापर्यंत त्यांनी गुजरातमधील सर्व प्रमुख मंदिरांना भेट दिली आहे. तर राहुल गांधी  हिंदू मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी देवदर्शन करत असल्याचा आरोप भाजपाने केला आहे.  दरम्यान, विकासाच्या मुद्यावरून घसरून वैयक्तिक टीकाटिप्पणीपर्यंत पोहोचलेला गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यासाठीचा प्रचार मंगळवारी संध्याकाळी थांबला. गुजरातमधील दुसऱ्या टप्प्याचे मतदान 14 डिसेंबर रोजी होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात एकूण 93 मतदारसंघांमध्ये मतदान होणार असून, मतमोजणी 18  डिसेंबरला होणार आहे.  गुजरातमधील सत्ता कायम राखण्यासाठी सत्ताधारी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पणाला लावलेली प्रतिष्ठा, राज्यात दीर्घकाळानंतर सत्तेत पुनरागमन करण्यासाठी काँग्रेसने कसलेली कंबर आणि पटेलांची नाराजी इव्हीएम मशीनमधून व्यक्त होण्यासाठी हार्दिक पटेल यांनी लावलेला जोर यामुळे गुजरात विधानसभेचा प्रचार बऱाचा गाजला. आता हा गुजराती मतदार दुसऱ्या टप्प्यात कुणाच्या पारड्यात आपले मत टाकतो आणि गुजरातमध्ये कुणाचे सरकार बनवतो हे पाहणे औत्सुक्याचे असेल.   

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीGujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017Hindutvaहिंदुत्व