शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

राफेल डील फक्त आणि फक्त अंबानींना 30 हजार कोटी देण्यासाठी- राहुल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2019 18:14 IST

राफेल प्रकरणावरुन काँग्रेस अध्यक्षांचा आक्रमक पवित्रा कायम

नवी दिल्ली: राफेल डीलवरुन भाजपा आणि काँग्रेसमध्ये जुंपली असताना आज राज्यसभेत कॅगचा अहवाल मांडण्यात आला. एनडीए सरकारनं केलेला करार यूपीए सरकारपेक्षा स्वस्त असल्याची माहिती या अहवालातून समोर आली. त्यामुळे राफेल डीलवरुन सातत्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर भाजपानं निशाणा साधला. मात्र यानंतरही राहुल गांधी त्यांच्या दाव्यांवर ठाम आहेत. अनिल अंबानींना 30 हजार कोटी रुपये देता यावे, याचसाठी मोदींनी राफेल करार केल्याचा आरोप राहुल यांनी पत्रकार परिषदेत केला. राफेल करारात कोट्यवधी रुपये वाचवल्याचा दावा मोदी सरकारनं केला होता. मात्र सरकारनं यातून केवळ 2.86 टक्के इतकीच रक्कम वाचल्याचं कॅगच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. सरकारनं दिलेला आकडा कॅगच्या अहवालात कमी झाला, असं इतिहासात पहिल्यांदा घडल्याचा दावा राहुल यांनी केला. याशिवाय त्यांनी या अहवालावर प्रश्नचिन्हदेखील उपस्थित केलं. 'हवाई दलाला विमानांची गरज आहे, असं पंतप्रधान मोदी, अर्थमंत्री अरुण जेटली आणि संरक्षणमंत्र्यांनी नेहमीच म्हटलं आहे. हवाई दलात लवकरात लवकर नव्या विमानांचा समावेश व्हावा, असं पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्र्यांनी वारंवार देशाला सांगितलं. मात्र नव्या करारामुळे राफेल विमानं देशात येण्यास उशीर होणार आहे,' असं म्हणत त्यांनी या कराराबद्दल पुन्हा एकदा शंका उपस्थित केली. कॅगचा अहवाल नीट पाहिल्यास अनेक महत्त्वपूर्ण माहिती गोष्टी समोर येतील, असं राहुल गांधी यांनी सांगितलं. 2007 च्या करारात बँक हमीचा समावेश होता. सोबतच गुणवत्तेचं हमीपत्रदेखील घेण्यात आलं होतं. मात्र नव्या करारात यांचा उल्लेख नाही, असं काँग्रेस अध्यक्ष म्हणाले. नरेंद्र मोदी घाबरले असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. राफेल डीलमधलं सत्य समोर येईल याची मोदींना भीती वाटते. नोकरशहा, हवाई दल, संरक्षण मंत्रालयातील अनेकांना याबद्दलची कल्पना आहे. राफेल प्रकरणात चोरी झाली, याची सर्वांना कल्पना आहे. जर यामध्ये घोटाळा झाला नसता, तर संयुक्त संसदीय समितीकडून चौकशी करायला हरकत नव्हती. मात्र मोदी सरकार घाबरलं असल्यानं त्यांनी संयुक्त संसदीय समितीसमोर हा विषय नेला नाही, असा दावा त्यांनी केला.  

टॅग्स :Rafale Dealराफेल डीलNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा