शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींनी नाव घेतलं नाही, मग भाजपाला का झोंबलं?, नाना पटोलेंचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2023 16:36 IST

राहुल गांधीनी भरसभेत एका विशिष्ट शब्दाचा वापर केल्याने गदारोळ

Rahul Gandhi Controversial remark Panauti : भारतीय संघाने मायदेशात झालेल्या विश्वचषक स्पर्धेत फायनलमध्ये धडक मारली होती. या स्पर्धेत भारत फायनलपर्यंत अजिंक्य होता. पण फायनलमध्ये ऑस्ट्रेलियन संघाने भारताला त्यांच्याच भूमित पराभूत केले आणि विश्वचषकावर सहाव्यांदा नाव कोरले. या सामन्यासाठी राजकीय आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेक बडे लोक आले होते. या सामन्याबाबत बोलताना एका ठिकाणी राहुल गांधी यांनी 'पनौती' या शब्दाचा वापर केला. त्यांच्या बोलण्याचा रोख कोणत्या व्यक्तीकडे होता, हे त्यांनी किंवा काँग्रेसमधील कोणत्याही नेत्याने सांगितले नव्हते. परंतु भाजपाने या मुद्द्यावरून राहुल यांच्यावर टीकेची झोड उठवली. या मुद्द्यावरून नाना पटोलेंनीभाजपावर पलटवार केला.

"राहुल गांधी राजस्थानमधील एका प्रचारसभेत बोलत असताना सभेतील गर्दीतूनच पनौती, पनौती असा आवाज येत होता, त्या संदर्भाने राहुल गांधी बोलले, त्यात राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी अथवा कोणत्याही व्यक्तीचे नाव घेतले नाही तरीही भाजपाला ते का झोंबले? त्यातून मोदींचा अपमान कसा होतो? अहमदाबाद स्टेडियमवरील क्रिकेट वर्ल्ड कपच्या फायनल मॅच दरम्यान ‘पनौती’ हा शब्द सोशल मीडियावर ‘ट्रेंड’ झाला होता, आजही तो ‘ट्रेंड’ होत आहे, ती एक जनभावना आहे पण सर्व ठिकाणी मीच आहे असे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो," असे नाना पटोले म्हणाले.

दरम्यान, "भाजपाला आपला पराभव स्पष्ट दिसत असल्यानेच हताश आणि निराश झालेल्या मोदी सरकारने राजकीय सुडबुद्धीने नॅशनल हेराल्डवर ईडीची कारवाई केली आहे. पण काँग्रेस पक्ष मोदी सरकारच्या अशा कारवायांना आम्ही घाबरणार नाही, असेही ते म्हणाले. नॅशनल हेराल्ड प्रकरणाची सर्व कागदपत्रे सार्वजनिक आहेत, यापूर्वीही ती जाहीर केलेली आहेत. पण या प्रकरणात सोनिया गांधी व राहुल गांधी यांना चौकशीच्या नावाखाली बोलावून दहा-दहा तास बसवून नाहक त्रास देण्यास आला होता, त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. जनतेने भाजपचा खोटारडेपणा ओळखला असून त्यांना पराभवापासून वाचता येणार नाही," असा इशारा नाना पटोलेंनी दिला.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNana Patoleनाना पटोलेBJPभाजपाcongressकाँग्रेस