शहरं
Join us  
Trending Stories
1
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
4
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
5
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
6
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
7
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
8
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
9
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
10
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
11
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
12
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
13
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...
14
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक
15
विद्यार्थ्याला मारहाण अन् उलटे टांगल्या प्रकरणी मुख्याध्यापक, ड्रायव्हरला अटक; शाळा बंद केली
16
Dussehra 2025: मृत्युच्या शेवटच्या क्षणी रावणाने लक्ष्मणाला दिलेला कानमंत्र माहितीय का?
17
अहिल्यानगर: ज्या रांगोळीवरून वाढला तणााव, ती काढणाऱ्याला अटक; एफआरआयमध्ये काय?
18
टीम इंडियानं आशिया कप जिंकताच मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला, विरोधकांनी असा टोला लगावला
19
“गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल”; शिंदे गटाला कुणाचा टोला?
20
३ वर्षांत ₹२४१ कोटींची कमाई! एवढा पैसा कुठून आला? स्वतः प्रशांत किशोर यांनी केला खुलासा 

राहुल गांधी चुकीचं बोलले नाहीत, सत्ताधाऱ्यांचा संसदेत नंगानाच; संजय राऊतांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2023 11:53 IST

सरकारी कर्मचारी संपावर जातायेत, शेतकरी लॉंग मार्च काढतायेत याचा अर्थ महाराष्ट्रात खदखद आहे असंही संजय राऊत म्हणाले.

नवी दिल्ली - या देशात लोकशाहीची रोज हत्या होते. राहुल गांधी काही चुकीचे बोलले नाहीत. राज्यसभेत काल बोलताना विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगेंचा माईक बंद केला. आम्हाला बोलू दिले जात नाही. ही लोकशाहीची गळचेपी नाही का? असा सवाल करत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधारी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. 

खासदार संजय राऊत म्हणाले की, या देशातील संसदेत आणि संसदेबाहेर राजकीय विरोधकांना संपवण्याचा डाव सुरू आहे त्याविरोधात व्यासपीठ मिळाल्यावर राहुल गांधी बोलले. संसदेत कालच्या गोंधळाला सुरुवात कुणी केली ते पाहा. राहुल गांधीनिमित्त आहे. गौतम अदानी आणि मोदी संदर्भावर चर्चा घडू नये यासाठी दोन्ही सभागृहात सत्ताधारी पक्षाने नंगानाच केला असा घणाघात त्यांनी भाजपावर केला. 

ही लढाई अन्यायाविरोधात, जनता रस्त्यावर उतरलीयसरकारी कर्मचारी संपावर जातायेत, शेतकरी लॉंग मार्च काढतायेत याचा अर्थ महाराष्ट्रात खदखद आहे. जनतेच्या मनातील सरकार असते तर रस्त्यावर जनता उतरली नसती. जनतेच्या विरोधात हे सरकार आहे. सुप्रीम कोर्टात सुरू असलेली ही सत्तासंघर्षाची लढाई नाही. ज्यांनी आमच्यावर डाका, दरोडा घातलाय आणि त्याला केंद्र सरकारने पाठिंबा दिलाय त्या अन्यायाविरोधात ही सुनावणी आहे. दोन्ही बाजूचे युक्तिवाद संपलेला आहे. या आठवड्यात निकाल लागायला हरकत नाही असं संजय राऊतांनी सांगितले. हे तर योद्ध्यांचे कर्तव्य सुभाष देसाई हे आदर्श नेते आहेत. त्यांनी काल स्पष्ट केले आहे. त्यांच्या मुलाने पक्षप्रवेश केल्याने काही फरक पडत नाही. मिंदे गटाला आनंद वाटतोय पण ही ओझी पुढे काय करायचं हा प्रश्न आहे. ही वॉशिंग मशिन बिघडेल इतका कचरा भाजपा आत टाकताय. प्रवेश होऊ द्या अजून काही होऊ द्या. त्यामुळे शिवसेना वाढीवर, विस्तारावर, जनमानसावर काही परिणाम होणार आहे. संघर्षात उतरल्यानंतर अशा प्रसंगाला सामोरं जाणं हे योद्धाचं कर्तव्य असते. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आम्ही त्यासाठी तयार आहोत असं सांगत राऊतांनी भूषण देसाईंच्या शिवसेना प्रवेशावर प्रतिक्रिया दिली आहे. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपा