शहरं
Join us  
Trending Stories
1
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
2
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
3
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
4
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
5
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
6
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
7
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
8
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
9
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
10
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
11
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
12
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
13
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
14
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
15
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
16
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
17
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
18
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
19
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
20
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!

Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 14:25 IST

Rahul Gandhi on Maharashtra Polls: राहुल गांधी यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत खळबळजनक आरोप केले.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत खळबळजनक आरोप केले. भाजपने महाराष्ट्र विधानसभा मॅच- फिक्सिंग करून जिंकली. तसेच भाजपने लोकशाही कमकुवत करण्याचे षड्यंत्र रचले, असे आरोप राहुल गांधी यांनी एका वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखातून केला. 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने २८८ पैकी २३५ जागा जिंकल्या. यापैकी एकट्या भाजपने १३२ जागा जिंकल्या, जी त्यांची महाराष्ट्र विधानसभेतील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. तर, त्यांच्या प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीला फक्त ५० जागेवर विजय मिळवता आला. हा निकाल उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासाठी मोठा धक्का होता. 

"ही किरकोळ फसवणूक नाही तर निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात होणारी हेराफेरी आहे. २०२३ मध्ये केंद्र सरकारने निवडणूक आयोगाच्या सदस्यांच्या निवडीत बदल केले, ज्यामध्ये आता मुख्य न्यायाधीशांच्या जागी एका केंद्रीय मंत्र्यांचा समावेश करण्यात आला. यामुळे निवडणूक आयोगाला निष्पक्ष राहणे कठीण झाले", असे राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधींनी त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवरून केलेल्या एका पोस्टमध्ये एनडीए सरकारवर गंभीर आरोप केले. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीदरम्यान आयोगाच्या निवड पथकात फेरफार करण्यात आला, मतदार यादीत बनावट नावे जोडण्यात आली, मतदानाचे आकडे जाणूनबुजून वाढवून सांगण्यात आले, भाजपला जिंकण्यासाठी आवश्यक असलेल्या ठिकाणी बनावट मते तयार करण्यात आली आणि पुरावे लपवण्यात आले, अशा पद्धतीने एनडीएने निवडणूक जिंकली, असे राहुल गांधी म्हणाले. 

भाजपचा पलटवारराहुल गांधींच्या या आरोपांवर भाजपने प्रत्युत्तर दिले. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते तुहिन सिन्हा यांनी राहुल गांधीचे आरोप लज्जास्पद असल्याचे म्हटले."राहुल गांधी पुन्हा एकदा देशातील संस्थांबद्दल वाईट बोलत आहेत. निवडणूक आयोगाने या गोष्टी अनेक वेळा स्पष्ट केल्या आहेत", असे सिन्हा म्हणाले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४BJPभाजपा