शेती बचाव यात्रा: हरयाणा सीमेवर नाट्यमय घडामोडी; राहुल गांधी यांना अखेर राज्यात प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2020 04:10 AM2020-10-07T04:10:33+5:302020-10-07T06:40:43+5:30

पटियालातील सनौर येथील रॅलीनंतर ‘शेती बचाव’ यात्रेच्या शेवटच्या दिवशी राहुल गांधी हे ट्रॅक्टरने हरयाणाच्या सीमेवर पोहोचले. त्यांच्यासमवेत पंजाब प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सुनील जाखड आणि वरिष्ठ नेते हरीश रावत होते. 

Rahul Gandhi Brings Congress Tractor Rally Into Haryana Amid High Drama | शेती बचाव यात्रा: हरयाणा सीमेवर नाट्यमय घडामोडी; राहुल गांधी यांना अखेर राज्यात प्रवेश

शेती बचाव यात्रा: हरयाणा सीमेवर नाट्यमय घडामोडी; राहुल गांधी यांना अखेर राज्यात प्रवेश

Next

पिहोवा (कुरुक्षेत्र) : पंजाबला लागून असलेल्या हरयाणाच्या सीमेवर घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर अधिकाऱ्यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि मोजक्या नेत्यांना कृषी कायद्याविरोधी रॅलीसाठी भाजपशासित हरयाणा राज्यात प्रवेश करण्याची परवानगी दिली.

पटियालातील सनौर येथील रॅलीनंतर ‘शेती बचाव’ यात्रेच्या शेवटच्या दिवशी राहुल गांधी हे ट्रॅक्टरने हरयाणाच्या सीमेवर पोहोचले. त्यांच्यासमवेत पंजाब प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सुनील जाखड आणि वरिष्ठ नेते हरीश रावत होते. पंजाबच्या पटियाला जिल्ह्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांच्यासोबत होते; परंतु पिहोवा सीमेवरील टेकोर गावानजीक महामार्गावर तासभर शेती बचाव यात्रा रोखण्यात आली.

हरयाणातील भाजप सरकारने सोमवारी म्हटले होते की, काँग्रेस नेते राहुल गांधी काही लोकांसोबत येऊ शकतात; परंतु राज्यातील वातावरण बिघडू शकते म्हणून पंजाबमधून मोठी गर्दी घेऊन आले तर परवानगी दिली जाणार नाही. मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनीही म्हटले होते की, राहुल गांधी यांना आपली भूमिका मांडण्याचा हक्क आहे; परंतु पंजाबमधून मोठ्या संख्येने लोक घेऊन आल्यास परवानगी दिली जाणार नाही.

सिरसा येथे आंदोलकांवर अश्रुधुराचा मारा...
नवीन कृषी कायद्याच्या विरोधात सिरसा येथे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांच्या घराभोवती घेराव घालण्यासाठी निघालेल्या आंदोलक शेतकऱ्यांवर पोलिसांनी पाण्याच्या फवाºयासह अश्रुधुराचा मारा केला. मंगळवारी दुपारी निदर्शने करण्यासाठी सिरसामध्ये पोहोचलेल्या शेकडो शेतकºयांनी कठडे तोडण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी आंदोलक शेतकºयांना तेथून पिटाळून लावण्यासाठी दोनदा पाण्याच्या फवाऱ्यासह अश्रुधुराचा मारा केला.

यावेळी झालेल्या धावपळीत काही शेतकरी जखमी झाले. सकाळपासून शेतकरी दसरा मैदानात जमले होते. शेतकरी संघटनांच्या नेत्यांच्या भाषणानंतर शेतकरी उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला आणि वीजमंत्री रणजित सिंह यांच्या घराला घेराव घालण्यासाठी जाणार होते. पोलिसांनी त्यांना रोखण्यासाठी मंत्र्यांच्या घरापासून काही अंतरावर कठडे लावले होते. दुपारी ३ वाजता तेथे पोहोचलेल्या शेतकºयांनी कडठे तोडण्याचा प्रयत्न केला.

Web Title: Rahul Gandhi Brings Congress Tractor Rally Into Haryana Amid High Drama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.