राहुल गांधींसोबत सेल्फी काढण्यासाठी 'ती' चढली गाडीच्या टपावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2017 19:26 IST2017-11-01T19:20:45+5:302017-11-01T19:26:14+5:30
कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी सध्या गुजरातमध्ये झंझावाती प्रचारात व्यस्त आहेत. बुधवारी त्यांनी भरूच येथे रोड शो केला. या दरम्यान तरूणांमध्ये राहुल गांधींबाबत क्रेझ पाहायला मिळालं.

राहुल गांधींसोबत सेल्फी काढण्यासाठी 'ती' चढली गाडीच्या टपावर
भरूच - कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी सध्या गुजरातमध्ये झंझावाती प्रचारात व्यस्त आहेत. बुधवारी त्यांनी भरूच येथे रोड शो केला. या दरम्यान तरूणांमध्ये राहुल गांधींबाबत क्रेझ पाहायला मिळालं. एक तरूणी तर राहुलसोबत सेल्फी घेण्यासाठी त्यांच्याच गाडीच्या टपावर चढली.
राहुल गांधींच्या रोड शो दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा गर्दी जमली होती. एका मिनी बसमधून राहुल यांचा रोड शो सुरू होता. बसच्या टपावरून राहुल गांधी गर्दीच्या दिशेने हात उंचावून अभिवादन करत होते. तेवढ्यात एक तरूणी राहुल गांधी यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी थेट बसच्या टपावर चढली. यावेळी तिने राहुल यांना पुष्पगुच्छही दिला आणि त्यानंतर राहुल यांच्यासोबत सेल्फी काढून घेतला.
सेल्फी काढल्यानंतर राहुल गांधी आणि त्यांच्या अंगरक्षकांनी तरूणीला टपावरून खाली उतरायला मदतही केली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ -
#WATCH: A girl gets onto Congress Vice President Rahul Gandhi's vehicle during his roadshow in #Gujarat's Bharuch, takes a selfie with him pic.twitter.com/blEnRXS2FK
— ANI (@ANI) November 1, 2017