शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

आता तर संरक्षण मंत्रालयही म्हणतंय चौकीदारही चोर है; राहुल गांधींचं मोदींवर राफेलास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 11:32 IST

राफेल डीलवरुन राहुल गांधी आक्रमक

नवी दिल्ली: राफेल डीलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थेट हस्तक्षेप केला. अनिल अंबानींच्या कंपनीला राफेलचं कंत्राट मिळावं म्हणून त्यांनी समांतर वाटाघाटी केल्या, असा गंभीर आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. पंतप्रधान मोदींनी थेट फ्रान्सशी वाटाघाटी केल्यानं संरक्षण मंत्रालयाची बाजू कमजोर ठरली, असं वृत्त आज 'द हिंदू' या इंग्रजी वृत्तपत्रानं प्रसिद्ध केलं. याबद्दल संरक्षण मंत्रालयानं तीव्र नाराजी व्यक्त केल्याचंही वृत्तात नमूद करण्यात आलं आहे. त्याचाच आधार घेत राहुल यांनी मोदींवर थेट हल्लाबोल केला. राफेल डीलसाठी संरक्षण मंत्रालयाची फ्रान्स सरकारसोबत बोलणी सुरू होती. मात्र त्यात पंतप्रधान कार्यालयानं हस्तक्षेप केला. याचा फायदा फ्रान्सला झाला. पंतप्रधान कार्यालयाकडून करण्यात आलेल्या हस्तक्षेपाचा आणि समांतर वाटाघाटींचा संरक्षण मंत्रालयानं निषेधही नोंदवला होता, असं वृत्त 'द हिंदू'नं आज प्रसिद्ध केलं. या वृत्ताच्या आधारे राहुल यांनी मोदींवर जोरदार हल्ला चढवला. पंतप्रधान अनिल अंबानींसाठी काम करतात. मोदींच्या हस्तक्षेपाचा प्रतिकूल परिणाम संरक्षण मंत्रालयाकडून सुरू असलेल्या बोलणीवर आणि वाटाघाटींवर झाला, असा स्पष्ट आरोप राहुल यांनी केला. फ्रान्सचे माजी पंतप्रधान ओलांद यांनी मोदींना चोर म्हटलं आणि आता संरक्षण मंत्रालय मोदींना चोर म्हणतंय, अशा शब्दांमध्ये राहुल मोदींवर बरसले.काँग्रेस भारतीय हवाई दलाला कमजोर करण्याचं काम करत असल्याचा गंभीर आरोप काल पंतप्रधान मोदींनी संसदेत केला होता. त्यालाही राहुल यांनी उत्तर दिलं. संरक्षण मंत्रालयानं पंतप्रधान कार्यालयाच्या हस्तक्षेपाचा निषेध केला आहे. त्यात काँग्रेसचा संबंध येतोच कुठे?, असा प्रतिप्रश्न राहुल यांनी केला. मोदींनी भारतीय हवाई दलाचे 30 हजार कोटी रुपये उचलून अंबानींना दिले. यामुळे हवाई दलाचं नुकसान झालं. मोदींनी हिंदुस्तान ऍरॉनिटिक्स लिमिटेडऐवजी अनिल अंबानींच्या कंपनीला राफेलचं कंत्राट मिळवून दिलं, याचा पुनरुच्चार राहुल यांनी केला.

टॅग्स :Rafale Dealराफेल डीलNarendra Modiनरेंद्र मोदीAnil Ambaniअनिल अंबानीDefenceसंरक्षण विभागindian air forceभारतीय हवाई दलRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसSupreme Courtसर्वोच्च न्यायालयNirmala Sitaramanनिर्मला सीतारामन