इंदूरच्या भागीरथपुरा भागात दूषित पाण्यामुळे झालेल्या मृत्यूमुळे आता राजकारण तापलं आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी या घटनेला 'जगण्याच्या अधिकाराची हत्या' म्हटलं आहे, तर भाजपाच्या नेत्या आणि माजी मुख्यमंत्री उमा भारती यांनी आपल्याच सरकारवर निशाणा साधला आहे. 'अक्षम्य पाप' असं म्हणत टीका केली आहे.
राहुल गांधी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मोहन यादव सरकारवर हल्लाबोल करताना म्हटलं की, "इंदूरमध्ये पाणी नाही, तर विष वाटलं गेलं आणि प्रशासन कुंभकर्णासारखं झोपेत होतं. घराघरात शोककळा पसरली आहे, गरीब हतबल आहेत आणि अशातच भाजपा नेत्यांची अहंकारी विधानं येत आहेत. ज्यांच्या घरात दु:ख आहे, त्यांना सांत्वन हवं होतं, मात्र सरकारने त्यांना अहंकार दिला."
"देवाने आनंद दिला, पुन्हा हिरावून घेतला"; १० वर्षांनी नवसाने झालेल्या ५ महिन्यांच्या अव्यानचा मृत्यू
"नेत्यांवर कारवाई कधी होणार?"
राहुल गांधींनी प्रशासनाला काही प्रश्न विचारले: "लोकांनी वारंवार घाण आणि दुर्गंधीयुक्त पाण्याची तक्रार केली, तरीही सुनावणी का झाली नाही? पिण्याच्या पाण्यात सांडपाणी कसं मिसळलं? वेळेवर पाणीपुरवठा का थांबवला नाही? जबाबदार अधिकारी आणि नेत्यांवर कारवाई कधी होणार? हे प्रश्न 'फुकट' नाहीत, तर ही उत्तर देण्याची मागणी आहे. स्वच्छ पाणी उपकार नसून तो जगण्याचा अधिकार आहे."
"१० वर्षांच्या नवसानंतर मुलगा झाला होता, पण..."; आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
दूधात मिसळलं नळाचं पाणी, तेच ठरलं विष; ५ महिन्यांच्या अव्यानचा मृत्यू, १० वर्षांनी झालेला मुलगा
"मोदीजी नेहमीप्रमाणे गप्प"
"जगण्याच्या अधिकाराच्या हत्येसाठी भाजपाचे डबल इंजिन सरकार, त्यांचे निष्काळजी प्रशासन आणि असंवेदनशील नेतृत्व पूर्णपणे जबाबदार आहे. मध्य प्रदेश आता कुप्रशासनाचा केंद्रबिंदू बनला आहे. कधी कफ सिरपमुळे मृत्यू, कधी सरकारी रुग्णालयात उंदरांमुळे मुलांचा जीव जातो, तर आता सांडपाणी मिश्रित पाणी प्यायल्याने मृत्यू होत आहेत. जेव्हा जेव्हा गरीब मरतात, तेव्हा मोदीजी नेहमीप्रमाणे गप्प राहतात" असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
Web Summary : Rahul Gandhi criticizes the Madhya Pradesh government after deaths due to contaminated water in Indore. He accuses the administration of negligence and insensitivity, calling it a violation of the right to life. He questioned why complaints were ignored and demanded accountability from officials. He also noted Modi's silence on the tragedy.
Web Summary : इंदौर में दूषित पानी से हुई मौतों के बाद राहुल गांधी ने मध्य प्रदेश सरकार की आलोचना की। उन्होंने प्रशासन पर लापरवाही और असंवेदनशीलता का आरोप लगाया, इसे जीने के अधिकार का उल्लंघन बताया। उन्होंने पूछा कि शिकायतों को क्यों अनदेखा किया गया और अधिकारियों से जवाबदेही की मांग की। उन्होंने मोदी की चुप्पी पर भी ध्यान दिलाया।