शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

प्रज्ञासिंह ठाकूरांच्या संदर्भात केलेल्या 'त्या' विधानावर राहुल गांधी ठाम

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 4:49 PM

नथुराम गोडसेला देशभक्त म्हणणाऱ्या प्रज्ञासिंह ठाकूरांनी यू-टर्न घेत माफीनामा दिला.

नवी दिल्लीः नथुराम गोडसेला देशभक्त म्हणणाऱ्या प्रज्ञासिंह ठाकूरांनी यू-टर्न घेत माफीनामा दिला. प्रज्ञासिंह ठाकूरांच्या माफीनाम्यानंतर संसदेत गदारोळ सुरूच होता. प्रज्ञासिंह ठाकूरांनी माफी मागितल्यानंतर भाजपानं राहुल गांधींनाही घेरण्याचा प्रयत्न केला. राहुल गांधींनी प्रज्ञासिंह ठाकूरांना दहशतवादी म्हटलं होतं. त्यानंतर प्रज्ञासिंह ठाकूरांनी राहुल गांधींच्या विरोधात विशेषाधिकाराचं उल्लंघन केल्याप्रकरणी नोटीस दिली आहे. परंतु राहुल गांधी प्रज्ञासिंह ठाकूरांसंदर्भात केलेल्या विधानावर अद्यापही ठाम आहेत. मी माझ्या विधानावर ठाम असून, मागे हटणार नसल्याचं राहुल गांधींनी स्पष्ट केलं आहे.तत्पूर्वी माझ्या विधानानं जर कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यास मी माफी मागते, असंही प्रज्ञासिंह ठाकूर म्हणाल्या होत्या. संसदेतील एका सदस्यानं मला दहशतवादी म्हटलं होतं. हा माझ्या प्रतिष्ठेवर हल्ला आहे. न्यायालयात माझ्याविरोधात अजूनही आरोप सिद्ध झालेले नाहीत, असंही त्या राहुल गांधींना उद्देशून म्हणाल्या आहेत. त्यानंतर राहुल गांधी आपलं विधान मागे घेतील, अशी अपेक्षा होती, परंतु राहुल गांधी अजूनही आपल्या विधानावर ठाम आहेत. आमची फक्त एकच मागणी आहे, कोणत्याही अटीशिवाय प्रज्ञासिंह ठाकूरांनी माफी मागायला हवी, अशी मागणी काँग्रेस नेते अधीर रंजन यांनी केली आहे. दुसरीकडे भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्रात काँग्रेसनं शिवसेनेबरोबर जात केलेल्या सत्ता स्थापनेवर टीका केली आहे. काँग्रेसनं शिवसेनेबरोबर सरकार स्थापन केलेलं आहे. शिवसेनेनंही सामनामधून नथुराम गोडसेला देशभक्त म्हटलं आहे. काँग्रेस सत्तेसाठी कोणत्याही मर्यादेपर्यंत लाचार होऊ शकते, असं निशिकांत दुबे म्हणाले आहेत.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीSadhvi Pragya Singh Thakurप्रज्ञा सिंह ठाकूर