Rahul Gandhi: खासदारकीनंतर राहुल गांधींना बंगलाही परत मिळणार, निर्णय होताच म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 16:50 IST2023-08-08T16:49:45+5:302023-08-08T16:50:19+5:30
Rahul Gandhi: काँग्रेसचे युवा नेते राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर लोकसभेचं सदस्यत्व परत एकदा मिळालं आहे. त्याबरोबरच आता राहुल गांधी यांना त्यांचे निवासस्थान असलेला तुघलक लेनवरील बंगला परत मिळणार आहे.

Rahul Gandhi: खासदारकीनंतर राहुल गांधींना बंगलाही परत मिळणार, निर्णय होताच म्हणाले...
काँग्रेसचे युवा नेते राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर लोकसभेचं सदस्यत्व परत एकदा मिळालं आहे. त्याबरोबरच आता राहुल गांधी यांना त्यांचे निवासस्थान असलेला तुघलक लेनवरील बंगला परत मिळणार आहे. सरकारी सूत्रांकडून मंगळवारी ही माहिती देण्यात आली. केरळमधील वायनाड येथून खासदार असलेल्या राहुल गांधी यांनी त्यांचं निवासस्थान परत मागितलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल गांधी यांना १२ तुघलक लेन येथील त्यांचं जुनं घरच परत मिळणार आहे.
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना संसद सदस्य म्हणून त्यांचं अधिकृत निवास्थान परत मिळण्याबाबत प्रतिक्रिया विचारण्यात आली तेव्हा संपूर्ण हिंदुस्तानच माझं घर आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. ते आसाम काँग्रेसच्या नेत्यांसोबत बैठकीसाठी एआयसीसीच्या मुख्यालयात पोहोचले होते.
#WATCH मेरा घर पूरा हिंदुस्तान है: सांसद के रूप में अपना आधिकारिक आवास वापस पाने की मीडिया रिपोर्टों पर कांग्रेस सांसद राहुल गांधी, दिल्ली
— ANI_HindiNews (@AHindinews) August 8, 2023
राहुल गांधी असम कांग्रेस के नेताओं के साथ बैठक के लिए एआईसीसी मुख्यालय पहुंचे। pic.twitter.com/Z2IsTciscl
मोदी आडनावाबाबत केलेल्या विधानासंदर्भात दोषी ठरवण्यात आल्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यामुळे त्यांना लोकसभेचं सदस्यत्वही गमवावं लागलं होतं. मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. त्यानंतर तीन दिवसांनी राहुल गांधी यांना लोकसभेचं सदस्यत्व परत बहाल करण्यात आहे. तसेच त्यासंदर्भात लोकसभा सचिवालयाकडूनही अधिसूचना काढण्यात आली.