Rahul Dravid Video: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविडचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत राहुल द्रविड नाराजीच्या स्वरात एका रिक्षाचालकाशी बोलताना दिसत आहे. हा व्हिडीओ बंगळुरूतील आहे. एका मालवाहू रिक्षाने राहुल द्रविडच्या कारला धडक दिल्यानंतरचा हा व्हिडीओ आहे.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या घटनेची माहिती समोर आली. मिळालेल्या माहितीनुसार, राहुल द्रविडच्या कारला एका लोडिंग रिक्षाची धडक बसली. त्यानंतर राहुल द्रविड आणि रिक्षाचालकामध्ये वाद झाला.
रिक्षाच्या धडकेमुळे कारचे नुकसान झाल्याचे राहुल द्रविड रिक्षाचालकाला सांगताना दिसत आहे.
राहुल द्रविडच्या कार रिक्षाची धडक, कुठे घडली घटना?
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी (४ फेब्रुवारी) घडल्याचे सांगितले जात आहे. सायंकाळी ६.३० सुमारास राहुल द्रविड कारने जात होता. त्याचवेळी रिक्षाने कारला धडक दिली. यासंदर्भात कोणत्याही पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झालेली नाही. पण, बंगळुरूतील हाय ग्राऊंड्स वाहतूक पोलीस ठाणे हद्दीत ही घटना घडली आहे.
राहुल द्रविड कारने इंडियन एक्स्प्रेस सर्कलवरून हाय ग्राऊंडकडे निघाला होता. रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. त्याचेवळी लोडिंग रिक्षा राहुल द्रविडच्या कारला येऊन धडकला.
पोलिसांनी काय सांगितले?
एका पोलीस अधिकाऱ्याने घटनेबद्दल बोलताना सांगितले की, 'ही एक छोटी घटना होती. पंरतू या प्रकरणात आम्हाला कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही.