शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
6
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
7
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
8
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
9
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
10
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
11
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
12
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
13
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
14
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
15
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
16
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
17
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
18
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
19
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
20
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं

राहुल व प्रियंका कुंभमेळ्यात स्नान करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2019 4:07 AM

उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल व प्रियंका मौनी अमावस्या किंवा वसंत पंचमीला कुंभमेळात स्नान करतील.

- शीलेश शर्मा नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये हिंदुत्वाचा झेंडा पुढे करणाऱ्या भाजपाला प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी व पक्षाच्या नवनियुक्त महासचिव प्रियंका गांधी यांनी कुंभमेळादरम्यान त्रिवेणी संगमात स्नान करण्याचा निर्णय घेतला आहे.उच्चपदस्थ सूत्रानी दिलेल्या माहितीनुसार राहुल व प्रियंका मौनी अमावस्या किंवा वसंत पंचमीला कुंभमेळात स्नान करतील. त्यामुळे देशभरात काँग्रेस केवळ मुस्लिमांचा पक्ष नसून सर्वधर्मसमभावामध्ये विश्वास असलेला सर्व धर्मांचा आदर करणारा पक्ष असल्याचा संदेश देता येईल. गांधी कुटुंबातील सदस्य कुंभमेळात स्नान करण्याचा हा पहिलाच प्रसंग राहणार नाही. यापूर्वी २००१ मध्ये तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनीही कुंभमेळात स्नान केलेले आहे.निवडणुकीपूर्वी प्रियंका यांचा पूर्व उत्तर प्रदेशातील प्रत्येक लोकसभा मतदार संघाचा दौरा करण्याचा प्रयत्न राहील. प्रियंका यांच्या रणनीतीचा विचार करता काँग्रेस पक्षाचा कार्यक्रम निश्चित करणारी समिती निवडणुकीच्या प्रचार सभांची निवड त्याच पद्धतीने करत आहे. प्रियंका मायदेशात दाखल होण्यापूर्वी हा कार्यक्रम तयार होईल, असे मानल्या जात आहे. त्यामुळे प्रियंका येथे दाखल होताच त्यांच्या सहमतीने कार्यक्रम जाहीर करता येईल.प्रियंका गांधी ३१ जानेवारी रोजी मायदेशी पोहचत असल्यामुळे त्यांच्या उत्तर प्रदेश दौºयाला अद्याप अंतिम रुप देण्यात आलेले नाही. पक्षाच्या सूत्रानी सांगितले की, लखनौहून अलाहाबाद मार्गे प्रियंका पूर्ण उत्तर प्रदेशचा दौरा करणार आहेत. निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर प्रियंका देशातील अन्य भागातही पक्षासाठी निवडक ठिकाणी प्रचारासाठी जातील. पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, प्रियंका यांच्या प्रचार मोहिमेचे मुख्य केंद्र पूर्व उत्तर प्रदेश राहील. त्यासाठी त्या काही दिवस अलाहाबादमध्ये तळ ठोकतील.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीPriyanka Gandhiप्रियांका गांधीcongressकाँग्रेसKumbh Melaकुंभ मेळा