“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 12:18 IST2026-04-05T12:17:12+5:302026-04-05T12:18:46+5:30

Raghav Chadha News: राघव चड्ढा पंजाबचे प्रश्न संसदेत मांडण्यात अपयशी ठरले, असा आरोप आम आदमी पक्षाने केला होता. याला राघव चड्ढा यांनी पुरावे देत उत्तर दिले.

raghav chadha slams aam aadmi party leader and said punjab is not a talking point for me it is my home my duty my soul | “पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले

“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले

Raghav Chadha News: राघव चड्ढा पंजाबचे प्रश्न संसदेत मांडण्यात अपयशी ठरले, असा आरोप करणाऱ्या आम आदमी पक्षाच्या नेत्यांवर राघव चड्ढा यांनी जोरदार पलटवार केला आहे. एक्सवर एक व्हिडिओ शेअर केला असून,  'आप'मधील माझ्या सहकाऱ्यांसाठी, हा केवळ एक छोटा ट्रेलर आहे. खरे चित्र अजून समोर यायचे आहे, असा इशाराही राघव चड्ढा यांनी दिला आहे. 

गेल्या काही दिवसांपासून राघव चड्ढा आणि आम आदमी पक्षांच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप, वार-पलटवार सुरू आहेत. त्याचाच हा पुढील अंक सुरू झाल्याचे म्हटले जात आहे. पंजाब हा माझ्यासाठी केवळ चर्चेचा मुद्दा नाही. ते माझे घर आहे, माझे कर्तव्य आहे, माझी भूमी आहे, माझा आत्मा आहे, असे राघव चड्ढा यांनी नमूद केले आहे. एक्सवर सुमारे तीन मिनिटांचा एक व्हिडिओ शेअर करत राघव चड्ढा यांनी पंजाबबाबत आपली भूमिका मांडली.

शेतकरी, धार्मिक तीर्थस्थळांबाबतचे मुद्दे उपस्थित केल्याचा पुरावा

राघव चड्ढा यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांसाठी किमान आधारभूत किंमत, शेतकऱ्यांचे कर्ज, वाढता पीक खर्च आणि पिकांचे अवशेष व्यवस्थापनासाठी केंद्राकडून मिळणारी आर्थिक मदत हे मुद्दे उपस्थित केले आहेत. तसेच गुरुद्वाराबाबतचा मुद्दा मांडताना राज्यसभेतील चर्चेचा भागही या व्हिडिओत समाविष्ट करण्यात आला आहे. याशिवाय, भटिंडा-बीकानेर रेल्वे सेवा,  या व्हिडिओतून राघव चड्ढा यांनी पंजाबबाबत कोणते मुद्दे राज्यसभेत उपस्थित केले, याचे पुरावेच दिले आहेत. 

दरम्यान,  मी घाबरलो आहे त्यामुळे निरर्थक मुद्दे उपस्थित करतो, असा आपचा आरोप आहे. पण मी संसदेत गोंधळ घालण्यासाठी, ओरडण्यासाठी, माइक तोडण्यासाठी जात नाही. मी पंजाब पाणीप्रश्न, दिल्ली वायुप्रदूषण, सरकारी शाळांची स्थिती अशा मुद्द्यांवर आवाज उठवला आहे. राज्यसभेतील उपनेतेपदावरून हटविलेले खासदार राघव चड्ढा यांनी आम आदमी पक्षाला प्रत्युत्तर देताना 'धुरंधर' चित्रपटातील 'क्योंकि मैं घायल हूँ, इसलिए घातक हूँ' या संवादाचा आधारही घेतला.

Web Title : राघव चड्ढा ने आप के आरोपों का जवाब दिया, पंजाब के प्रति प्रतिबद्धता जताई।

Web Summary : राघव चड्ढा ने संसद में पंजाब के मुद्दों को उठाने में विफल रहने के आप के आरोपों का खंडन किया और किसानों की चिंताओं, धार्मिक मामलों और रेलवे सेवाओं को उठाने के प्रमाण दिए। उन्होंने कहा कि पंजाब उनकी आत्मा और कर्तव्य है, सिर्फ एक राजनीतिक मामला नहीं।

Web Title : Raghav Chadha counters AAP's criticism, asserts commitment to Punjab.

Web Summary : Raghav Chadha refuted AAP's claims of neglecting Punjab's issues in Parliament, providing evidence of raising farmers' concerns, religious matters, and railway services. He asserted Punjab is his soul and duty, not just a political matter.